हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो वेगवेगळ्या कोनातून करीत आहेत. सर्व तपास संस्था सतत बर्याच लोकांची चौकशी करत असतात. अशा परिस्थितीत ईडीच्या चौकशीदरम्यान सुशांतच्या कंपनीचे संचालक वरुण माथूर यांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.
वरुण माथूर यांनी सांगितले की, सुशांतला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बायोपिक बनवायची होती. त्यासाठी ते सौरभशी बोलले होते.
वरुणने पुढे सांगितले की, जेव्हा त्यांनी याबाबत सौरभ गांगुलीशी बोलले तेव्हा गांगुलीने त्याला नकार दिला. सौरभ गांगुली म्हणाले की, प्रेक्षकांना यापूर्वीच धोनी आवडला आहे, त्यामुळे प्रेक्षक तुम्हाला माझ्या बायोपिकमध्ये पसंत करू शकणार नाही. त्यामुळे सुशांतची ही बायोपिक बनू शकली नाही.
तसेच सुशांतसिंग राजपूतला 12 पात्र असलेल्याचित्रपटावर काम करायचे होते, असेही वरुणने सांगितले. स्वामीं विवेकानंद, मदर टेरेसा, महात्मा गांधी यासारख्या व्यक्तिरेखांना एका चित्रपटात आणायचं होतं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’