Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रितेशच्या ‘वेड’ने मोडला मंजुळेंच्या ‘सैराट’चा रेकॉर्ड; कोट्यवधींचा गल्ला करीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
14.5k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘वेड’ हा चित्रपट गेल्यावर्षी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला तुफान लोकप्रियता लाभली आहे. या चित्रपट रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत दिसते आहे आणि तिने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फक्त आणि फक्त त्याचंच वेड ज्याला त्याला लागलं आहे. हा वेडेपणा इतका कहर आहे कि, नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशच्या ‘वेड’ या चित्रपटाने खरोखरच प्रेक्षकांना वेड लावलंय हे आता सिद्ध झालं आहे. या चित्रपटाने ‘एका दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट’ हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम मोडला आहे आणि एका दिवसात ५.७० कोटींची कमाई केली आहे. ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून खूप वर्षानंतर रितेश आणि जिनिलिया यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना तुफान आवडते आहे. चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहता रितेश आणि जिनिलीया प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटी कमाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mumbai Film Company (@mumbaifilmcompany)

‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या प्रतिसादामुळे या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. कालपर्यंत या चित्रपटाने कमावलेल्या एकूण रकमेचा आकडा ३५.७० कोटी इतका आहे आणि फक्त ११ दिवसांत इतकी कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड ‘लय भारी’ चित्रपटाच्या नावे होता.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

पण हि जागा आता ‘वेड’ चित्रपटाने घेतली आहे. या चित्रपटाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रितेश, जिनिलिया यांसह अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावत ठुमके लगावले आहेत.

Tags: Box Office Earningnagraj manjuleRiteish deshmukhsairatVed
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group