हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुःखद निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर तज्ञ डॉक्तरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते. गेल्या दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र आज अचानक त्यांच्या प्रकृती पुन्हा खालावली आणि हि झुंज संपली. गोखले कुटुंब, निकटवर्तीय, मित्र मंडळी आणि सिनेविश्वातून विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.
Maharashtra | Veteran Actor Vikram Gokhale passes away in Pune.
(File Pic) pic.twitter.com/bnLFbRyYnm
— ANI (@ANI) November 26, 2022
बुधवार २३ नोव्हेंबर पासून मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती प्रचंड गंभीर होती. बुधवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी या बातम्यांचे खंडन करीत त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगितले होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारपासून त्याची प्रकृती खालावली. यानंतर अधिकृत हेल्थ अपडेट देताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले. यानंतर आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचे सांगण्यात आले आणि अखेर आता त्यांच्या निधनाची वार्ता समोर आली आहे.
संपूर्ण सिनेसृष्टीसाठी विक्रम गोखले यांचे निधन हि बाब असह्य वेदना देणारी असून त्यांच्या चाहत्यांनी टाहो फोडला आहे. अनेक मराठी तसेच हिंदी सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींनी ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गोखले यांचे निधन झाल्यामुळे मनोरंजन विश्वात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र ते मनोरंजन विश्व गाजविणारा अभिनेता म्हणून विक्रम गोखले यांची ख्याती आहे. अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी घशाच्या आजारामुळे २०१६ साली मंचावरील क्रियाकलापांमधून निवृत्ती घेतली होती.
Discussion about this post