Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड जगतावर दुःखाचा डोंगर; ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन काळाच्या पडद्याआड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचे होते. युसूफ हुसैन हे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांचे सासरे होते. दरम्यान हंसल मेहता यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, कोरोनाची लागण झाल्यानंतर युसुफ हुसैन यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. युसूफ हुसैन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात, मालिकेत काम केले आहे. यात ‘दिल चाहता है’, ‘ओह माय गॉड’, ‘दबंग ३’, ‘धूम’ यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचा यात समावेश आहे. यामुळे त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे.

Veteran star Yusuf Husain passes away, Hansal Mehta pens emotional note for father-in-law

Read @ANI Story | https://t.co/lkHWdIBFJq#YusufHussain #Bollywood pic.twitter.com/DQf7QTAe5O

— ANI Digital (@ani_digital) October 30, 2021

दरम्यान हंसल मेहता यांनी एक ट्विट करीत हुसैन यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भावुक होत लिहिले कि, “मी शाहिद या चित्रपटाचे २ शेड्युल पूर्ण केले होते. पण काही कारणामुळे मी अडकलो होतो. मी अडचणीत सापडलो होतो. चित्रपट निर्माता म्हणून माझी कारकीर्द संपत आली होती. त्याचवेळी ते (युसूफ हुसैन) माझ्याजवळ आले. त्यांनी मला सांगितले की माझ्याकडे एक फिक्स्ड डिपॉझिट आहे. मला त्याचा काहीही उपयोग नाही. तू जर अडचणीत असशील तर…, असे सांगतच त्यांनी एका चेकवर सही केली. यानंतर शाहिद चित्रपट पूर्ण झाला. ते माझ्या वडिलांसारखे होते.

RIP Yusuf Husain. pic.twitter.com/laP0b1U732

— Hansal Mehta (@mehtahansal) October 29, 2021

 

पुढे, “मात्र आज ते निघून गेले. युसूफ सर, या नवीन आयुष्यासाठी मी कायम तुमचा ऋणी असेन. आज खरंच मी अनाथ झालो. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मला तुझी खूप आठवण येईल. माझी उर्दूही खराब राहिल आणि हो – लव्ह यू लव्ह यू लव्ह यू… हंसल मेहता हे युसूफ हुसैन यांचे जावई आहेत. त्यांचा युसूफ हुसैन यांची मुलगी सफीना हुसैन हिच्यासोबत मुस्लिम रिवाजानुसार निकाह झाला आहे.

#RIP Yusuf ji. We worked together in several films starting with Kuch na kaho and lastly on Bob Biswas. He was gentle, kind and full of warmth. Condolences to his family. 🙏🏽 pic.twitter.com/6TwVnU0K8y

— Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 (@juniorbachchan) October 30, 2021

अभिनेते युसूफ हुसैन यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्या अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

Sad News!!! Condolences to @safeenahusain @mehtahansal & the entire family!!! Rest in peace Yusuf saab🙏 https://t.co/q7CFbbEo95

— manoj bajpayee (@BajpayeeManoj) October 30, 2021

युसूफ हुसैन यांची कारकीर्द दीर्घकाळ गाजली. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि मालिकेत काम केले आहे. त्यांनी २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब के बरस’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर ‘विवाह’, ‘दिल चाहता है’, ‘राज’, ‘हजारों ख्वाईशे ऐसी’, ‘धूम’, ‘शाहिद’, ‘ओह माय गॉड’, ‘क्रिश ३ट, ‘रईस’, ‘दबंग ३’, ‘द ताश्कंद फिल्म्स’, ‘जलेबी’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले.

The man who faced his truths on #SachKaSaamna like nobody else finally meets the truth of everyone’s life. I will remember him for someone so real that it feels unreal. Respect. #YusufHussain pic.twitter.com/xVc3KFPB34

— Rajeev Khandelwal (@RK1610IsMe) October 30, 2021

शिवाय ‘सीआयडी’, ‘तुम बिन जाऊ कहां’, ‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’, ‘श्श्शू. कोई है’ आणि ‘मुल्ला नसरुद्दीन’ यासारख्या मालिकेत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या.

Tags: Abhishek Bachchandeath newsDue To Covid 19hansal mehtaRajiv KhandelwaltwitterYusuf Hussain
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group