Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तू आणखी सराव कर…’; ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केले अमृता फडणवीसांचे मार्गदर्शन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Asha bhosale_Amruta Fadanavis
0
SHARES
115
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सोहळा २४ मार्च २०२३ रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यामध्ये रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आशा भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी आशा भोसले यांनी अमृता फडणवीस यांना अधिक सराव करण्याच्या सल्ला दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे कि, ‘मी नुकतंच आशा भोसले यांना भेटले. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर संगीतबाबत छान संवादही साधला. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनबद्दल मार्गदर्शन केले. आता आम्ही पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहोत’. अमृता यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायनाची आवड तर सर्वश्रुत आहे. अमृता फडणवीस यांनी गेल्या काही काळात विविध ढंगाची अनेक गाणी गायली आहेत. ज्यामुळे त्यांच्या गायकीचे दिवसागणिक फॅन्स वाढू लागले आहेत. अमृता यांचे कोणतेही नवे गाणे रिलीज झाले कि त्यावर आधी ट्रोलिंग होते. पण असं असूनही अमृता यांनी आपले गाणे थांबवले नाही. याउलट त्या विविध जॉनरची गाणी गाऊन आपल्या कलेला आणखीच धार लावताना दिसत आहेत आणि म्हणूनच आशा भोसले यांनीदेखील त्यांना गायनाचा सराव सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Tags: Aasha bhosaleAmruta FadanvisInstagram Postviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group