हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, धडाडीचे पत्रकार, उत्तम लेखक अशी ख्याती असलेले डॉ. अनिल अवचट यांचे आज निधन झाले आहे. माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. यातच त्यांचे निधन झाले. दरम्यान ते ७८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण साहित्यिक क्षेत्र आणि समाजसेवा संघांमध्ये शोकाकुल वातावरण आहे. डॉ. अनिल अवचट हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्याकडून शिकण्यासारखे अमाप होते. त्यामुळे अवचट यांचे निधन आगामी पिढीचे नुकसान म्हणावे लागेल.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक, साहित्यिक मा.अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.@NCPspeaks #AnilAvchat pic.twitter.com/WnDehRrLrK
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 27, 2022
डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी आपली एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातदेखील त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला होता. शिवाय त्यांच्या लेखणीला विशेष ताकद प्राप्त होती. एखादा मुद्दा, एखादा विषय ते उत्तम रित्या सादर करीत असत. अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून यायचे. डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते. मात्र तरीही त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिलाय. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठीच वापरली. अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलेले आहे. जे समाजाच्या नास्तिक डोळ्यांत अंजन घालायचे काम करते.
डॉ. अनिल अवचट यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती या अवचट यांच्यामध्ये होत्या. डॉ. अनिल अवचट यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा (2021) मसाप जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. अवचट यांनी साहित्यिक विश्वात आपले योगदान दिले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय असा मोठा मित्रपरिवार आहे.
अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांच्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये आज वापरली जाते. या मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अत्यंत नामांकित पुरस्कारांपैकी एक आहे. हा पुरस्कार मिळविणाऱ्या व्यक्तींमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदार आणि अजून बऱ्याच दिग्गज मंडळींचा समावेश होतो.
Discussion about this post