हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि तिचा पती अभिनेता विकी कौशल सध्या एकमेकांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करत आहेत. लग्नानंतर हे कपल बॉलिवूड सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय, ट्रेंडिंग आणि सर्वाधिक चर्चेतील कपल म्हणून ओळखलं जात आहे. यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. विकी आणि कॅटरिना लग्नानंतर एका ऍडव्हेंचर ट्रिपसह, निसर्गाच्या सानिध्यात एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी राजस्थानमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी जंगल सफारी देखील केली आणि याचे काही फोटो कॅटरिनाने शेअर केले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि एकमेकांसोबत नववर्ष साजरं करण्यासाठी विकी- कॅट फिरायला गेले आहेत. कॅटरिनाने शेरा केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत निवांत वेळ घालवताना दिसत आहेत. कॅटरिनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सो मॅजिकल…. मला वाटतं की हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.’ या फोटोंमध्ये कॅटरिना, विकी यांच्याशिवाय लाईव्ह प्राण्यांचे फोटोदेखील दिसत आहेत. यामध्ये काही फोटो वाघाचे आहेत आणि एव्हढंच ट्रोलर्सला पुरेसं होत.
अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केलेले फोटो कुठले आहेत..? यावर अनेक नेटकऱ्यांची चर्चा सुरु आहे. तर अनेकांनी विकी आणि कॅट राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जवाईमध्ये असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोंवर क्युट कमेंट केल्या आहेत. तर काही त्यांना ट्रोल करण्यात व्यस्त आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘हॅप्पी हॉलिडे’. तर दुसर्याने म्हटले आहे, ‘याला म्हणतात जंगल में मंगल’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘कुठेही गेलीस तरी टायगर तुझा पिच्छा सोडणार नाही’. शिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘अरे इथे ब्लॅक डिअर आहे.. पळा नायतर सलमान भाई येईल’. आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘वाघाला तर त्याची मावशी भेटायला आली आहे असं वाटत असेल’.
Discussion about this post