Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विकिसोबत सारा अली खाननेही घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन; नेटकरी म्हणाले, ‘ती मुस्लिम असली तरीही…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Vicky_Sara
0
SHARES
104
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ हा सिनेमा २ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाने अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळवत कमाईचा उत्तम जोर धरला आहे. विकी आणि साराची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. यामुळे विकी कौशल आणि सारा अली खान जोरदार हवा सुरु आहे. दरम्यान सिनेमाला मिळणारे यश पाहता विकी आणि सारा यांनी सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. त्यांचा फोटो व्हायरल होताच त्यावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सिनेमाच्या प्रमोशनसाठी विकी कौशल आणि सारा अली खान ठिकठिकाणी फिरताना दिसत आहेत. दरम्यान विकी आणि सारा ज्या त्या ठिकाणी गेले असता तेथील देवी देवतांचे आवर्जून आशीर्वाद घेताना दिसत आहेत. काही दिवसांआधीच ते लखनऊमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी गेल्याचे दिसले. यावेळी सारा अली खान मुस्लिम असून देवळात पूजा पाठ करताना दिसली आणि हे पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. यावेळी जेव्हा साराने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतानाचा फोटो शेअर केला तेव्हा मात्र हवेने दिशा बदलल्याचे दिसले.

साराने हा फोटो शेअर करत लिहिलं, ‘मंगलमूर्ती मोरया. थँक यू बाप्पा!’. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या समर्थनात कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘सारा त्या सर्व धर्म समभाव यावर विश्वास ठेवतेस, हे दिसून येत आहे. मात्र हिंदुत्वाच्या दिशेने तुझा जास्त कल आहे. चांगली गोष्ट आहे..’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘मी एक मुस्लीम मुलगी आहे आणि मला तुझ्याबाबत कोणतीही तक्रार नाही सारा.. तू हिंदू देवी देवतांचा सम्मान करतेस पूजा करतेस कारण तुझी आई हिंदू आहे.. हे मी समजूच शकते. त्यामुळे नकारात्मक टीकांकडे दुर्लक्ष कर’.

Tags: Bollywood ActressInstagram PostSara Ali KhanSocial Media CommentsViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group