Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पाठक बाईंच्या बॅचलर पार्टीचा VIDEO व्हायरल; लुंगीवाल्या डान्सची इंस्टावर हवा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 4, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Akshaya Deodhar
0
SHARES
418
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुझ्यात जीव रंगला मालिकेत रील लाईफ शेअर करणारे राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्याआधी दोघेही आपली बॅचलर लाईफ एन्जॉय करत आहेत. नुकताच सोशल मीडियावर अक्षया देवधरचा बॅचलर पार्टीतील भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी तिची बॅचलर पार्टी झाली आणि यासाठी तिच्या खास मैत्रिणी आल्या होत्या. त्यांनी मिळून लुंगीमध्ये साऊथ तडका देणारा एक डान्स करीत रील व्हिडीओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर भारी चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अभिनेत्री अक्षया देवधर मिसेस जोशी होण्याआधी आपली बॅचलर लाईफ पुरेपूर आनंदाने जगते आहे. आपल्या बॅचलर पार्टीमध्ये ‘रा रा रेड्डी’ या गाण्यावर अक्षयाने आपल्या मैत्रिणींसोबत लुंगीमध्ये डान्स केला आहे. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर भारी चर्चेत आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अक्षयासोबत तिच्या खास मैत्रिणी मुक्ता लेले आणि मानसी कानेटकर दिसत आहेत. या तिघींनीसुद्धा लुंगी परिधान केली आहे आणि भन्नाट लुंगी डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

याआधी सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिकच्या केळवणाचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील चांगलेच व्हायरल झाल्याचे दिसले. अक्षया आणि हार्दिक हे रील ते रिअल तयार झालेले अतिशय क्युट जोडपे आहे. या दोघांनी मालिकेतून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

त्यामुळे दोघांचाही विशेष असा चाहता वर्ग आहे. जो त्यांना मिस्टर आणि मिसेस पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. अद्याप तरी यांच्या लग्नाची तारीख अधिकृतपणे समोर आलेली नाही. पण केळवण आणि बॅचलर पार्टीचे फोटो व्हिडीओ पाहता येत्या दिवाळीपर्यंत लग्नाचा बार उडण्याची शक्यता आहे.

Tags: Akshaya DeodharBachelor PartyHardeek JoshiInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group