Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विदुलाचा क्लासी अंदाज नेटकऱ्यांना करतोय घायाळ; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 19, 2022
in सेलेब्रिटी, फोटो गॅलरी, बातम्या
Vidula Chougule
0
SHARES
206
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे ‘बॉईज ३’ या चित्रपटाची चर्चा आहे. बॉईज आणि बॉईज २ च्या भरघोस यश प्राप्तीनंतर निर्मात्यांनी बॉईज ३ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. गेल्या शुक्रवारी १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या विकेंडला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३.५ करोड इतकी कमाई केली आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत ‘जीव झाला येडापीसा’ फेम अभिनेत्री विदुला चौगुले दिसत आहे. यामध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. यासह तिने सोशल मीडियावर शेअर केलेलं फोटोशूटसुद्धा चांगलंच व्हायरल होताना दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

अभिनेत्री विदुला चौगुले हिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे नवं फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये विदुलाने नव्या काळातील नव्या ट्रेंडनुसार पेहराव केल्याचे दिसत आहे. या फोटोशूटमध्ये विदुलाने ऑफ व्हाईट रंगाचा कोट आणि पॅन्ट परिधान केली आहे. पण यासोबत तिने अतिशय लक्षवेधी असा भरलेला नेकपीस परिधान केलाय. सोबतच उजव्या हाताच्या बोटात अंगठी देखील परिधान केली आहे. तिचा हा सेमी एथनिक लूक चाहत्यांना भावला आहे. हे फोटोशूट शेअर केल्यापासून यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment (@everestentertainment)

विदुलाच्या या क्लासी अंदाजाचं तिचे चाहते आणि अन्य नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने यावर ‘हार्ड ना..’ अशी कमेंट केली आहे. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘माईंड ब्लोईंग’. याशिवाय कुणी तिला गॉर्जिअस म्हणतंय तर कुणी तिला क्युटिपाई म्हणताना दिसत आहे. अनेकांनी या फोटोवर हार्ट इमोजी आणि फायर इमोजी शेअर करीत आपली पसंती दर्शवली आहे. अभिनेत्री विदुला चौगुलेबद्दल सांगायचं झालं तर, तिला खरी प्रसिद्ध मालिका क्षेत्रातूनच मिळाली. कारण कलर्स मराठीच्या गाजलेल्या ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेत तिने साकारलेली जिगरबाज सिद्धी सगळ्यांच्या लक्षात राहिली आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressVidula ChouguleViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group