हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये प्रेक्षक वर्ग असा काही रमून जातो कि मालिकेतील कलाकार त्यांना आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटू लागतो. शिवाय या मालिका बराच काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतात. मालिकेतील कथानक, त्यातील पात्र, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या सर्व गोष्टींसोबत प्रेक्षक वर्ग जोडला जातो. त्यामुळे एखादा भाग पहायचा चुकला कि प्रेक्षकांच्या जीवाची घालमेल होते. ती होऊ नये म्हणून आता या मालिका अगदी सहज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. टीआरपीच्या बाबतीत मालिका विश्वात नेहमीच चढाओढ सुरु असते. पण आई कुठे काय करते या मालिकेचा ऑनलाईन टीआरपीचा ग्राफ कौतुकास्पद आहे.
टीआरपीच्या यादीत भले वर खाली असेल पण ऑनलाइन टीआरपीच्या यादीत स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका अव्वल क्रमांकावर आहे. कारण कोणत्याही प्रवासात किंवा फावल्या वेळात प्रेक्षक हि मालिका पाहणे पसंत करत आहेत. त्यामुळे ही मालिका गेले कित्येक आठवडे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सगळ्यात जास्त पाहिली जाणारी मालिका ठरतेय. या मालिकेने ऑनलाइन टीआरपीच्या शर्यतीत पहिलं स्थान पटकावलं आहे. भले टीव्हीवरील टीआरपी यादीत या मालिकेने दुसरे स्थान पटकावले असेल. पण प्रेक्षकांचा कल पहिल्यापासून या मालिकेकडे अधिक राहिला आहे.
मुख्य म्हणजे ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी केवळ स्टार प्रवाह नव्हे तर झी मराठी, सोनी मराठी, कलर्स मराठी अशा प्रत्येक वाहिनीवरील कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे आता एखादा एपिसोड चुकलाच तर प्रेक्षक ओटीटी माध्यामातून मालिका पाहतात. ऑनलाईन मालिकांच्या टीआरपी यादीत ‘आई कुठे काय करते’ हि मालिका अव्वल आहे.
तर दुसऱ्या क्रमांकावर ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिका आहेत. शिवाय ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिकादेखील प्रेक्षक ऑनलाइन पाहण्याला पसंती देत आहेत.
Discussion about this post