हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा दशहरा मेळावा भारी खास ठरला. कारण यावेळी दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेनेतील दोन गट दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना दिसले. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण रंगलं. तर बीकेसीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण रंगले. दरम्यान महाराष्ट्रतील तमाम जनता या दोन्ही गटांवर आणि नेत्यांवर तसेच त्यांच्या भाषणातील शब्दाशब्दावर टीका करताना दिसली. याबाबत बोलताना विजू माने यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि ट्रोलर्सला उपरोधिक टोला लगावला आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी उपरोधिक भाष्य केले आहे. या पोस्टमध्ये एक माणूस निवांत जमिनीवर झोपलेला दिसत आहे. त्यावर विजू माने यांनी लिहिले आहे कि, ‘स्वत: उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा मला झेपेल ते मी करतो.’ त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टरला सोबत एक कॅप्शनही दिले आहे. ‘माझी झोप मला प्यारी…×$#त गेली दुनियादारी. राजकीय तज्ञ बनणं थांबवा. काही समस्या फार गंभीर असतात, त्या राजकारण्यांवर सोडून दिलेल्या बऱ्या..’ असे लिहीत त्यांनी हि पोस्ट पूर्ण केली आहे.
यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर अभिनेते विद्याधर जोशी यांनी कमेंट करीत विजू माने यांची चौकशी केली आहे. जोशींनी लिहिले कि, काय झालय ??? तू का आणि कोणावर रागावला आहेस?. यावर माने म्हणाले की, मी कशाला कोणावर रागावतोय? राजकारणावर अक्कल पाजळणाऱ्या ( सन्माननीय अपवाद वगळता.) लोकांची गंमत वाटली म्हणून सुचलं. यावर पुन्हा जोशी म्हणाले कि, पण म्हणजे फार कमी किंवा कशावरच खूप लोकांना बोलता येणार नाही!!@ ह्याला काहीच अर्थ नाही कळला नाही . यावर पुन्हा रिप्लाय करत माने म्हणाले कि, अरे ज्याना काही अक्कल नाही असे अनेक लोक प्रत्यक्ष राजकारणात आहेत, नेते आहेत, मंत्री आहेत!!! मग आम्ही साध सोशल मीडिया वर मनातील बोलायच ही नाही??.
Discussion about this post