हॅलो बॉलीवुड ऑनलाईन | देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिने जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे समर्थन केल्यामुळे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे वादात सापडले आहेत. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ‘कंगना राणावत हिने 2014 पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हंटले आहे. मी केवळ तिच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. मी देशातील एकाही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,’ असे गोखले यांनी सांगितले.
जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कंगना हिने एका कार्यक्रमात जी काही देशातील स्वातंत्र्याबाबत वक्तव्ये केली. कंगनाची दोन वर्षांतली मते तिची वैयक्तिक आहेत. स्वातंत्र्याबद्दल तिने व्यक्त केलेल्या मताला तिची वैयक्तिक कारणे आहेत. तिचे समर्थन करताना माझी कारणे वैयक्तिक आहेत. मी तिला ओळखतही नाही. मी केवळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
18 मे 2014 च्या ‘गार्डियन’मध्ये जे लिहिले गेले आहे तेच कंगना बोलली होती. ती काही चुकीचे म्हणाली नाही एवढेच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे. 2014 पासून जागतिक पटलावर सक्षम उभं राहायला सुरुवात झाली. मी माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या 30 वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही, असे गोखले यांनी सांगितले.
Discussion about this post