Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अखेर प्रतिक्षा संपली! ‘विक्रम वेधा’ OTT’वर रिलीज होणार; जाणून घ्या.. कधी आणि कुठे पाहता येणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 10, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Vikram Vedha
0
SHARES
224
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक काळ होता जेव्हा मनोरंजनासाठी फक्त थिएटर उपलब्ध होते. पण आजकल थिएटरमध्ये जसा चित्रपट रिलीज होतो तसाच ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज होतो आणि तितकंच मनोरंजन करतो. शिवाय कोणत्याही प्रवासाची गरज नाही.. अगदी घरबसल्या निवांत आपण चित्रपटाचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे थिएटर रिलीजपेक्षा जास्त ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करणारे प्रेक्षक जास्त आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ ओटीटीवर कधी येणार अशी चर्चा असताना आता प्रतीक्षा संपली आहे आणि आनंदाची बातमी आली आहे. येत्या दोन दिवसांतच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होतो आहे.

IPL mein teams ki rivalry ke saath… ab dekho Vikram aur Vedha ki rivalry.

Watch the World Digital Premiere of Vikram Vedha – Friday 12 May only on #JioCinema. Streaming Free!#VikramVedhaOnJioCinema @iHrithik #SaifAliKhan pic.twitter.com/5qGYUbLPov

— JioCinema (@JioCinema) May 10, 2023

‘विक्रम वेधा’ हा चित्रपट २९ सप्टेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. जवळपास ६ महिने होऊनही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला नव्हता. अनेक प्रेक्षक हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार..? याची वाट पाहत होते. अखेर हि प्रतीक्षा संपली असून ‘विक्रम वेधा’ जियोच्या नवीन सुपर अॅपवर प्रदर्शित होणार आहे, असे सांगितले जात आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या १२ मे २०२३ पासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याबाबत नुकतीच ‘जिओ सिनेमा’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

याआधी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट ८ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता समोर आलेल्या अपडेटनुसार हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ १२ मे पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. ‘विक्रम वेधा’ हा २०१७ साली प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यामध्ये अभिनेता आर माधवन आणि विजय सेथुपती मुख्य भूमिकेत होते. पुष्कर गायत्री यांनी मूळ चित्रपट आणि हा रिमेक दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला थिएटर रिलीज दरम्यान प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. पण आता तब्बल ६ महिन्याचा कालावधी उलटल्याने ओटीटी रिलीजला प्रेक्षक किती पसंती देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Tags: Hrithik RoshanOTT ReleaseSaif ali khanVikram VedhaViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group