Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्राईम टाईम आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’; अक्षय वाघमारेने लिहिली करारी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 29, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Akshay Waghmare
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ हा ‘शिवराज अष्टकातील’ चौथा चित्रपट आहे. याआधी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटांनी सुवर्ण इतिहासाची पाने अलगद उलघडली आहेत. त्यामुळे शेर शिवराज हा चित्रपट इतिहास प्रेमींसह अन्य प्रेक्षकांसाठी खास आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कसा केला..? हे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चांगलाच गाजतोय. प्रेक्षकांची गर्दी अगदी तुडुंब असतानाही थिएटरमध्ये मात्र प्राइम टाइम शोज मिळत नाही म्हणून प्रेक्षक वर्ग नाराज आहे. यामुळे महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्राइम टाईम मिळावे यासाठी ‘शेर शिवराज’च्या निमित्ताने अभिनेता अक्षय वाघमारेने करारी पोस्ट लिहून आगपाखड केली आहे. ‘जाहीर निषेध’ लिहीत त्याने हि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

अभिनेता अक्षय वाघमारे याने अधिकृत सोशल मीडियावर हि पोस्ट शेअर केतन लिहिले आहे कि, ‘नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा बोलले गेले आहे, पण पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट ‘शेर शिवराज’ हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा.

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

स्वराज्याची स्थापना ते परकियांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला. आतासुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शोचे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात. या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत. या सगळ्याचा विचार कोण करणार? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का?

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी याविषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही? नाहीतर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करताना निर्मातेदेखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील. मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादासाहेब फाळके यांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे? हा पण एक प्रश्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे. तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार? बस झालं यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही. मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. ‘प्राईम टाईम आमच्या हक्काचे’ , ‘नाही कुणाच्या बापाचे’ अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

Tags: Akshay waghmareMarathi MovieSher ShivrajSocial Media Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group