हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदी वरील डान्सिंग रिऍलिटी शो ‘डान्स दिवाने ज्युनिअर’चा ग्रँड फिनाले भाग रविवारी झाला. या निमित्त डान्स दिवानेच्या मंचावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान आला होता. यावेळी आमिरने सगळे स्पर्धक आणि परीक्षक यांच्यासोबत भारी वेळ घालवला. खूप मजा आणि मस्ती करत हा भाग पूर्ण झाला. पण आयकॉनिक प्रसंग ठरला तो आमिर आणि नितु कपूर यांचा डान्स. ‘आती क्या खंडाला’ या सुप्रसिद्ध गाण्यावर त्यांनी ठुमके लावले आणि प्रेक्षकांना मोहित केले.
या कार्यक्रमात स्पर्धकांपासून परीक्षकांपर्यंत प्रत्येक जण आमिर खानसोबत मंचावर थिरकताना दिसला. मुख्य म्हणजे खूप मोठ्या ब्रेकनंतर आमिर आता ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर यावेळी आला होता. दरम्यान या विशेष एपिसोडमध्ये आमिरने असे काही रंग भरले कि बस… आमिरच्या ‘आती क्या खंडाला’ या गाण्याचे अनेक चाहते आहेत. यानंतर आता या गाण्यावरील नितु कपूर यांचा आमीरसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर तुफान गाजतोय.
https://www.instagram.com/p/CgHcwNcJjL-/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओत अभिनेता आमिर खान आणि दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर ‘गुलाम’ चित्रपटाच्या ‘ए क्या बोलती तू’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्या दोघांनाही डान्स करताना पाहून सगळ्यांनाच जल्लोष आला होता. शोचा होस्ट करण कुंद्रा आणि इतर सारेच त्यांना पाहून जोराजोराने चिअर करत होते. आमिर खान आणि नीतू कपूर यांनी हे सुप्रसिद्ध गाणं इतकं सुपर रिक्रिएट केलं आहे कि हा व्हिडीओ एकदा तरी पहायलाच हवा. पुन्हा एकदा प्रेक्षकांना आणि आमिरच्या चाहत्यांना त्याचा आपुन तापून अंदाज पाहायला मिळाला.
Discussion about this post