हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा उल्लेख अप्सरा म्हणून केला जातो तो काही उगाच नाही. सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी ती हुकवत नाही. सध्या सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे अफाट जाळे पसरले आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत. ते पाहून नेटकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत. या फोटोंमध्ये खरोखरंच सोनाली एखादी अप्सरा असावी अशी भासते आहे.
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने निळ्याशार रंगाचा छान असा घागरा चोळी परिधान केला आहे. सोबत तिने निळ्या स्टोन ज्वेलरीने आपला लूक पूर्ण केला आहे. शिवाय स्मोकी आय मेकअप आणि साजेशी हेअर स्टाईल तिच्या लुकला आणि लक्षवेधी बनवीत आहे. यामध्ये सोनाली अतिशय कमालीची सुंदर दिसते आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर हे फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी ते व्हायरल केले आहेत.
सोनालीच्या या नव्या फोटोशूटला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. सोबतच या फोटोंवर ढीगभर लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस देखील पाडला आहे. अनेकांनी या फोटोंवर कमेंट करताना तिच्या सौंदर्याची भरभरून तारीफ केली आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी तिच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. या फोटोंवरील प्रतिक्रिया पाहता यावर हार्ट इमोजीचा नुसता पाऊस पाऊस पडल्याचे दिसत आहे. फक्त चाहते आणि नेटकरी नव्हे तर सिने विश्वातील अनेक सेलिब्रिटींनीदेखील सोनालीच्या या लुकला विशेष पसंती दिली आहे.
Discussion about this post