Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता मोंजोलिकाचा थरार अनुभवा ओटीटीवर; ‘भूलभुलैया 2’ पहा नेटफ्लिक्सवर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bhulbhulaiyya 2
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महिनाभरापूर्वी बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेतून २० मे रोजी एक अनोखा थरार घेऊन आला होता. ज्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या ओळखीची मंजोलीका परतल्याचे पाहायला मिळाले. ‘भुलभुलैय्या २’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मन तर जिंकलीच. याशिवाय बॉक्स ऑफीसवरदेखील तुफान धुमाकूळ घातला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १७९ करोड रूपयांची कमाई केली आहे. चित्रपट हिट झाला आणि कार्तिकच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. अनेकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात पाहिला तर अनेकांची हि संधी मुकली. म्हणूनच आता ओटीटी वर हा चित्रपट मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

विविध कारणांमुळे अनेक प्रेक्षकांना ‘भुलभूलैय्या २’ हा चित्रपट पाहता आला नाही. त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरविले. यानंतर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. यामुळे आता घरबसल्या मंजोलिकाचा थरार अनुभवता येणार आहे. फादर्स डेच्या निमित्ताने १९ जून रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. नेटफिक्सच्या सोशल मीडिया पेजवर याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. शिवाय भुलभुलैय्या २ या चित्रपटाचे पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करीत हा चित्रपट ओटीटीवर येतोय हे सांगण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

या आधी १५ वर्षापूर्वी भुलभुलैय्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. चित्रपटाच्या पहिल्या भागानेसुद्धा बॉक्स ऑफीसवर चांगली तगडी कमाई केली होती. या सिनेमात अक्षय कुमार, विदया बालन, शायनी आहुजा, अमिषा पटेल यांच्या मुख्य आणि महत्वाच्या भूमिका होत्या. यानंतर नव्या कोऱ्या दुसऱ्या भागात अर्थात भूलभुलैया २ मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांच्यासह तब्बूची खास आणि विशेष भूमिकेत दिसून आली आहे. रहस्यमयी आणि रोमँटिक कथानकाच्या प्रेक्षकांसह समीक्षकांनाही भुरळ घातली आहे.

Tags: Bhulbhulaiyya 2Instagram PostKarthik AryanNetflixOTT Release
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group