हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १ डिसेंबर आणि अखेर प्रेक्षकांची लाडकी जोडी राणा दा आणि पाठक बाई खऱ्या खुऱ्या आयुष्यात लग्न गाठ बांधणार आहेत. पण याआधी सोशल मीडियावर त्यांच्या लग्न विधींचे खास फोटो त्यांनी शेअर केले आहेत. जे कमालीचे व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी केळवण, मग लग्नाचा बस्ता, साडीचे विणकाम, ग्रहमख, मेहंदी आणि हळद. अशा प्रत्येक विधीचे त्यांनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या अक्षयाच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो कमाल व्हायरल होत आहेत.
मेहंदीच्या रंगाने म्हणे नवऱ्याचं किती प्रेम आहे ते कळतं. पण अक्षया आणि हार्दिक यांच्याबाबतीत मेहंदीच्या रंगाची काही गरज आहे असं वाटत नाही. कारण लग्न विधी एन्जॉय करताना या दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचा जो आनंद खुललाय तोच सांगतोय कि ते एकमेकांसोबत आयुष्य व्यतीत करण्यासाठी किती आतुर आहेत. मालिकेत बरकत हि भूमिका साकारणारा अभिनेता अमोल देखील अक्षया आणि हार्दिकच्या लग्न विधींमध्ये सामील होता. तसेच अभिनेत्री वीणा जगताप देखील मेहंदीसाठी गेली होती. दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील अक्षयाचा मेहंदीचा लूक कमालीचा व्हायरल होत आहे.
मेहंदी सेरेमनीसाठी अक्षयाने अतिशय सुंदर असा लूक केला होता. जांभळा, पिवळा, लाल गुलाबी रंगाचा सुंदर असा आऊटफिट अक्षयाने मेहंदीसाठी परिधान केला होता. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. शिवाय तीने ऑक्सिडाइज ज्वेलरीच्या सहाय्याने आपला लूक पूर्ण केला होता. लग्नासाठी अक्षयाने हातावर आणि पायांवर मेहंदी काढली आहे. हातावर तिने अक्षया आणि हार्दिक नाव लिहून घेतली आहेत.
सोबतच एंगेजमेंट सेरेमनीतील फोटोसारखे चित्र देखील तिने काढून घेतले आहे. सोबतच एका हातावर तिने वधू रेखाटून घेत सात वचनंसुद्धा लिहून घेतली आहेत. या सेरेमनीवेळी अमोल हार्दिकला देखील घेऊन आला होता आणि यावेळी अक्षयाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हा आनंद आणि उत्साह असाच भरभरून त्यांच्या आयुष्यात राहो!
Discussion about this post