Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सारा आणि नोरा चमकल्या; पहा खास फेस्टिव्ह लूक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 21, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sara-Nora
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी आली कि सगळीकडे रोषणाई आणि दिव्यांचा झगमगाट होतो. घरात पाहुणे मंडळी येतात. खमंग फराळ, सुवासिक उटण्याचा घरभर वास दरवळत असतो. सर्वत्र दिव्यांची आरास केलेली असते आणि आभाळात फटाक्यांचा धमाका असतो. हे सगळं कसं हवंहवंसं असतं. कारण दिवाळी हा सण मुळातच फार आनंद घेऊन येतो. या दिवसात सगळे नवनवीन कपडे घालून मिरवताना दिसतात. मग अशा सिजनमध्ये सेलिब्रिटी कसे काय मागे राहतील..? नुकत्याच पार पडलेल्या मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सारा अली खान आणि नोरा फतेहीच्या कमाल चर्चा रंगली.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हि तिच्या स्टाईसमुळे तर नोरा फतेही तिच्या टोन्ड फिगरमुळे चर्चेत असतात. या दोन्ही अभिनेत्री अशा आहेत कि त्यांनी काहीही परिधान केले तरीही त्या कमालीच्या सुंदर दिसतात. बॉलिवूड सिनेकलाकारांना विविध रंग संगतीच्या डिझायनर कपड्यांमध्ये सुंदर दर्शविणारे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घरी नुकतीच दिवाळीची पार्टी पार पडली. या दिवाळी पार्टीचे आयोजन अतिशय भव्य होते. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीत सामील होण्यासाठी आले होते. प्रत्येकाचा लूक हा अतिशय लक्षवेधी होता. मात्र कॅमेराची नजर वळली ती नोरा फतेही आणि सारा अली खान यांच्याकडे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी झालेल्या या दोन्ही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होत्या. यावेळी साराने गोल्डन रंगाचा सुंदर असा लॉन्ग लेहेंगा परिधान केला होता. तसेच नोरानेदेखील पिंक कलरचा अतिशय सुंदर असा ट्रान्स्परन्ट लेहंगा परिधान केला होता. या दोघींचाही लूक अतिशय कमाल होता.

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

मनीष मल्होत्राच्या या दिवाळी पार्टीतील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान या पार्टीसाठी सारा अली खानसोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खानदेखील सहभागी झाला होता. त्याचेही काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags: Bollywood CelebritiesDiwali 2022Instagram PostNora fatehiSara Ali KhanViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group