Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गणा धाव रे..! ‘दे धक्का 2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; म्युझिक लॉंच सोहळादेखील संपन्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
De Dhakka 2
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का २’ प्रदर्शनास सज्ज झाला आहे. थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय म्हणत दे धक्का २ ची गाडी आता एकदम सुसाट धावायला तयार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टिझरने नुसता धुमाकूळ घातला आहे. यानंतर आता दे धक्का २ चा हटके ट्रेलर आणि बहारदार गाणी आजपासून प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसतील.

येत्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून अख्खा महाराष्ट्र गाजवताना दिसेल. या चित्रपटात मेधा मांजरेकर, मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अभिनेते प्रवीण तरडेसुद्धा दिसणार आहेत. तत्पूर्वी नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. इतकेच नव्हे तर चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये तीच मजा, मस्ती, तुफान पळापळ, मजेशीर किस्से आणि बरंच काही पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आपणही लंडन वारी करणार आहोत.

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो कि, लंडनमध्ये इंडियन अँबेसेडरच्या वतीने मकरंदला पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित केले जाते. मग हि जत्रा सगळी लंडनकडे रवाना होते. कुणी भारतीय म्हणून हिणवलं तर त्यांना आपला ठसका दाखवताना हे दिसतात. पण परदेशात जायचं म्हणजे थोडी भीती तर असतेच. शिवाय तिथली लोक आपल्यापेक्षा तरबेज निघतात याची जाधवांना प्रचिती येते. मग पुन्हा एकदा संसाराचा गाडा ओढत मकरंद आणि सुमी आपलं कुटुंब घेऊन जीवाची दाणदाण करताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

या ट्रेलरमध्ये थोडी मजा आहे, थोडे किस्से आहेत, भन्नाट कथानक आणि भन्नाट डायलॉग आहेत, कमालीची गाणी आणि बहारदार नृत्य आहे. एकंदरच हा चित्रपट पूर्ण मनोरंजनाचं पॅकेट आहे. इतकंच नाही तर फक्त १२ तासांत ‘दे धक्का २’ च्या ट्रेलरने केला १ मिलियनचा टप्पा पार केलाय.  त्यामुळे आता प्रतीक्षा ५ ऑगस्टची.

View this post on Instagram

A post shared by PeepingMoon Marathi News (@peepingmoonmarathi)

या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च दरम्यान अवधूत गुप्ते, हितेश मोडक, वैशाली म्हाडे अशा कमालीच्या सुरेल गायकांनी परफॉर्मन्स दिले. तर संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बॉस २ मराठी फेम नेहा शितोळेने चित्रपटासाठी गाणे लिहिले आहे.

Tags: de dhakka 2Marathi upcoming movieMusic LaunchOfficial TrailerViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group