हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्न करणार आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेदरम्यान या दोघांचा जीव खरंच एकमेकांमध्ये रंगला आणि अखेर त्यांनी बोहल्यावर चढायचं ठरवलं. सध्या त्यांच्या लग्नाची एकदम जोरदार अशी जय्यत तयारी सुरु आहे. येत्या डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न आहे आणि नुकताच त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा फोटो त्यांची मैत्रीण ऋचा आपटे हिने शेअर केला आहे.
सगळ्यांनाच आता कधी एकदा हार्दिक आणि अक्षया म्हणजेच राणा दा आणि अंजली बाईंचा लग्नसोहळा पार पडतोय असं झालंय. मुख्य म्हणजे अक्षया आणि हार्दिक दोघेही लग्नाआधीच्या प्रत्येक विधीचा मान राखत त्याचा पुरेपूर आनंद लुटत आहेत. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ते मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या घरी केळवण एन्जॉय करताना दिसले. यानंतर आता त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. हार्दिक आणि अक्षया आपल्या जवळच्या मित्र-परिवाराला, नातेवाईकांना सगळ्यांना लग्न पत्रिका देऊन लग्नाला येण्याचे आमंत्रण देत आहेत.
अभिनेत्री रुचा आपटे हि अक्षया आणि हार्दिकची खास मैत्रिण आहे. त्यामुळे तिला आमंत्रण तर यायचं होतंच. नुकतंच या दोघांच्या लग्नाची पत्रिका तिच्यापर्यंत पोहोचली आहे. मग काय..? तिच्या पोटात आनंद मावेलच कसा..? म्हणून तिने लगेच पत्रिकेचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबत लिहिलं आहे कि, ‘अक्षया आणि हार्दिक…लगीन घाई सुरु…’ पण या पत्रिकेचा लूक कमाल आहे. शुभ्र रंग सोबत लाल रंगात नावं आणि चंदेरी रंगातलं विड्याचं पान. मुख्य म्हणजे हि लग्न पत्रिका पूर्ण मराठीत आहे. अद्याप लग्नाची तारीख अधिकृत जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र येत्या डिसेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार असल्याची माहिती आहे.
Discussion about this post