हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अँग्री यंग मॅन शशांक केतकर याने विविध मालिकांमध्ये विविध आशयाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने साकारलेलय सर्व भूमिकांना प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे शशांकची फॅनफॉलोईंग जबरदस्त आहे. शशांक केवळ एक अभिनेता नसून तो एक उत्तम आणि परखड वक्ता आहे. अनेकदा सोशल मीडियावर तो विविध विषयांना हात घालून आपले मत मांडताना दिसतो. अभिनयविश्वासह सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही तो भाष्य करतो. सध्या त्याची होळीनिमित्त केलेली सणसणीत पोस्ट अनेकांना बोचणारी ठरतेय.
‘मराठी भाषा’ या मुद्द्याला हात घालत शशांक केतकरने एक जळजळीत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका दिनदर्शिकेचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये मराठी सणांना अधोरेखित करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘होळी.. धूलिवंदन.. आणि रंगपंचमी हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमी ला होळी म्हणू नका.. ”आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी”.. आपण हिंदीच अनुकरण budget मध्ये करतो का..??? नाही ना … मग चुकांमध्येतरी कशाला..’. आता शशांकची हि पोस्ट वाचून कुणी चुकूनच होळीला रंगपंचमी म्हणण्याची हिम्मत करेल.
सध्या सोशल मीडियावर शशांकची हि पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. त्याच काय आहे.. उद्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असल्यामुळे शशांकने ही खास पोस्ट शेअर करून लक्ष वेधले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याचे समर्थन केले आहे. एका नेटकऱ्याने तर दिन दर्शिकेच्यादेखील चुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘हे तुझे म्हणणे योग्यच आहे. पण, कालनिर्णय वाले पौर्णिमा शब्द पौर्णि वरच्या ओळीत आणि मा खालच्या ओळीत असं छापतात ?? यश वरच्या ओळीत आणि वंतराव खालच्या ओळीत ? असंच ‘छा पत’ होते इतकी वर्षे की मी आज वाचलं ?’
Discussion about this post