हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षात रिलीज झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अगदी दणाणून टाकला होता. एक नवा इतिहास रचत ‘कांतारा’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडून काढले. या चित्रपटासाठी रिषभ शेट्टीचे अजूनही जगभरात कौतुक होत आहे. चित्रपटाची कथा इतकी हटके होती कि अजूनही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. शिवाय चित्रपटाची गाणी अत्यंत लक्षवेधी ठरली. यातील ‘वराह रूपम’ हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने गायले आहे. या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पण अलीकडेच एका कॉन्सर्टमध्ये अरिजीतने हे गाणे अगदी मनापासून गायले. इतकेच काय तर हे गाणे गाताना त्याने एक अशी कृती केली ज्यामुळे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Arijit Singh Live – Varaha Roopam 🙏 | Bangalore 2023 #ArijitSingh #ArijitSinghLive #varaharoopam #Kantara pic.twitter.com/xOlkTPEsfd
— ARIJITIAN FANS (@arijitianfans) March 5, 2023
बॉलिवूड संगीत सृष्टीतील लोकप्रिय गायक अरिजित सिंग हा त्याच्या सुमधुर आवाजासाठी आणि विविध जॉनरच्या गाण्यांसाठी प्रचंड चर्चेत येत असतो. त्याच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेरही त्याचे अनेक चाहते आहेत. अलीकडेच बंगळुरू येथे त्याचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. यावेळी त्याने ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटातील ‘वराह रूपम’ हे गाणे गायले. अरिजितने हे गाणे त्याच्या खास शैलीत गायला नुसती सुरवात केली असताच प्रेक्षकांना प्रतिसाद पाहण्यासारखा होता. शिवाय या गाण्याच्या सुरुवातीला अरिजीतने मनोभावे हात जोडून देवाचे स्मरण केले आणि त्याच्या या कृतीने चाहत्यांची मन जिंकली आहेत.
He joined his hands, singing with so much respect
Shows his humility
King you have my heart ❤️— Niranjana Kurup (@ArijitianNiro) March 5, 2023
अरिजीतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘येह होते है संस्कार.. एक हि दिल है कितनी बार जितोगे…’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘त्याने गाणे गाताना हात जोडले आहेत… तो प्रार्थना करतोय.. इतक्या आदराने तो हे गाणे गातोय कि त्याचे गाणे देवापर्यंत पोहावचले असेल.. म्हणूनच तू आमच्या हृदयात कायम आहेस अरिजित..लव्ह यु’. ‘कांतारा’मधील ‘वराह रुपम’ हे गीत फार विशेष आहे. कारण यामध्ये श्री विष्णू यांच्या वराह अवताराची स्तुती करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटामध्येदेखील या गाण्याला खास महत्त्व आहे. मध्यंतरी या गाण्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईमुळे चित्रपट निर्माते आणि चाहते नाराज झाले होते. मात्र कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे हे गाणे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले.
Discussion about this post