हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे राणा दा आणि पाठक बाई म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले. या जोडीने प्रेक्षकांना असं का हि वेड लावलं कि आजही ते याच नावाने ओळखले जातात. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री एव्हढी जबरदस्त होती कि त्यांनी खऱ्या आयुष्यातही या केमिस्ट्रीचा विचार केला. यांनतर आता खऱ्या आयुष्यात हार्दिक आणि अक्षया यांनी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकतेच त्यांच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. यातील राणा दाच्या हळदीची खास झलक पहा.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाची नुसती चर्चा होती. पण आता त्यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. हार्दिकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर तिच्या अक्षयाच्या ग्रहमख विधीचे आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
यानंतर आता हार्दिकच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या मेहंदी कार्यक्रमासाठी हार्दिक अक्षयाच्या घरी त्यांचा मित्र अभिनेता अमोल नाईक गेला होता. यावेळी त्याने ‘दाजी को लेकर आ रहा हू मैं’ अशा हटके कॅप्शनसह पोस्ट शेअर केली होती.
या व्हिडीओमध्ये हार्दिक हातात मेहंदीचे कोन घेऊन उभा दिसतोय. तर फुलांनी मेहंदी असं नाव लिहिलेलंसुद्धा दिसत आहे. याशिवाय राणा दाच्या हळदीला मित्रांनी नुसता धिंगाणा घातला आहे. सोशल मीडियावर राणा दाच्या हळदीचे कमाल व्हिडीओ आणि फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग ‘अहा’ हा हॅशटॅग कमाल ट्रेंड करतोय. कारण हा हॅशटॅग ‘अ’ म्हणजे अक्षया आणि ‘हा’ म्हणजे हार्दिक असा लग्नासाठी तयार करण्यात आला आहे. माहितीनुसार, उद्या पुण्यातील ढेपे वाड्यात अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाचा बार उडणार आहे. तर मग चला लग्नाला…
Discussion about this post