हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करू पाहणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ अनेकदा चर्चेत असते. तिने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतून ‘मोमो’ हे चित्रविचित्र पात्र साकारले आणि त्यानंतर बिग बॉस मराठीमध्ये प्रवेश केला. यामुळे ती भलतीच प्रकाश झोतात आली. बिग बॉसमुळे घराघरात पोहोचलेली मीरा आज अनेक लोकांची लाडकी अभिनेत्री आहे. तिने बिग बॉस मध्ये जाम राडे केले पण स्वतःची पक्की जागा निर्माण केली. आजकाल ती सोशल मीडियावर सक्रिय दिसते. अशातच तिने एक असा व्हिडीओ शेअर केला आहे जो चांगलाच चर्चेत आला आहे.
अभिनेत्री मीरा जगन्नाथ सोशल मीडियावर चांगली ऍक्टिव्ह असते. त्यामुळे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. सध्या तिचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रिक्षाने प्रवास करत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिने प्रवासातील रस्त्यांची दुरावस्था आणि रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे दाखवणारा हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओसाठी तिने बॅकग्राऊंडला ‘बाबूजी जरा धीरे चलो’ हे गाणे वापरले आहे. इतकेच नव्हे तर सोबत तिने भन्नाट कॅप्शन सुद्धा लिहिले आहे.
या व्हिडिओला मीराने कॅप्शन देताना लिहिले आहे कि, ‘डोळे बंद करा आणि रोलर कोस्टरचा आनंद घ्या’. मीराचा हा व्हिडीओ २ दिवसांपूर्वीचा आहे. पण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्यामुळे ट्रेंडिंग व्हिडीओजपैकी एक ठरतोय.
अनेकजण या व्हिडीओवर कमालीच्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘बाबुजी अनस्टॉपेबल’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, खरंच फील केलं मीसुद्धा’. तर आणखी एकाने लिहिले आहे कि, ऑटो बनली रोलर कोस्टर’. याशिवाय आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, ‘नवीन चॅलेंज.. रस्ता शोधा’.
Discussion about this post