हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी ऐतिहासिक मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’मधील महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या भूमिकेमुळे ती विशेष प्रकाशझोतात आली आणि घराघरांत पोहोचली. तिने साकारलेली महाराणी येसूबाई ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सध्या ती अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासोबत ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य करत आहे. या दरम्यान नाशिक दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये प्राजक्ताने भाकऱ्या थापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यनिमित्त नाटकाची संपूर्ण टीम नाशिकला पोहोचली होती. इथे त्यांनी नाशिकच्या ‘साधना मिसळ’ला भेट दिली. यावेळी प्राजक्ता गायकवाड या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चक्क भाकऱ्या थापायला बसली. हा एक सुंदर आणि वेगळा अनुभव घेतल्याचा आनंद तिने व्हिडिओतून शेअर केला आहे. प्राजक्ताने पहिल्यांदाच भाकरी केली आणि तिचा प्रयत्नही यशस्वी झाला. त्यामुळे तिचा आनंद चेहऱ्यावर ओसंडू लागला होता. जो या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर प्राजक्ता गायकवाडने म्हटले आहे कि, ‘नाशिकची सुप्रसिद्ध ‘साधना मिसळ’ला भेट दिली. त्यावेळी भाकरी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी ठरला. भाकरी जमली. पहिल्यांदाच भाकरी केली आहे.’ हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि प्राजक्ताच्या सध्या राहणीमानाचं तिचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने तर कवितेतून तिचे कौतुक केले आहे. त्याने कमेंट केली आहे कि, ‘पहिल्या प्रयत्नात आला भाकरीला गोल आकार ..तु हळूच केली महाराष्ट्र कन्या ही भूमिका साकार… तुझा हा साधेपणा मनाला अलगद भाळला ..हळूच हात कवितेकडे वळला’
Discussion about this post