हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीची ख्याती आहे. त्याच वय वाढत असलं तरीही त्याचा चाहता वर्ग रोज नव्याने वाढताना दिसतो आहे. चॉकलेट बॉय, प्रेमवीर, इमोशनल, सेन्सिबल अशा विविध विशेषणांसह स्वप्नीलने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. सध्या स्वप्नील झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत सौरभ पटवर्धन ही भूमिका साकारतो आहे. या भूमिकेवर लोक प्रेम करत आहेत. अशातच त्याचा एक मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये त्याने साकारलेल्या विविध पात्रांविषयी तो त्याला काय वाटत हे सांगताना दिसतोय.
आजतागायत स्वप्नीलने अनेक माध्यमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे. त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका त्याच्या आयुष्यात काहीतरी खास भूमिका बाजवते हे सांगताना त्याने आपल्या भावना या मुलाखतीत व्यक्त केली आहे. हि मुलाखत अमृता खानविलकरने घेतलेली असून हा व्हिडीओ बराच जुना आहे.
स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी रामानंद सागर यांच्या ‘उत्तर रामायण’ या टीव्ही मालिकेत रामपुत्र कुशची भूमिका साकारून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे रामानंद सागर यांच्या हिंदी मालिका ‘श्रीकृष्ण’मध्ये त्याने भगवान श्रीकृष्ण साकारले. त्याची हि भूमिका प्रचंड गाजली. पुढे न संपणारी लिस्ट आहे इतकी विविध पात्र त्याने साकारली आहेत.
दरम्यान या मुलाखतीत अमृता खानविलकरने स्वप्नीलला त्याच्या विविध भूमिकेतून तो काय शिकला..? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना स्वप्नील म्हणाला कि, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या घनाने मला साधेपणा शिकवला, दुनियादारीतल्या श्रेयसने मैत्री.. दुनियादारी शिकवली, मुंबई- पुणे- मुंबईमधल्या गौतमने ‘प्रेम म्हणजे काय..? प्रेम हे सांगून होत नाही.. आणि प्रेम हे ठरवून करता येत नाही’ हे शिकवलं आणि सर्वात महत्वाचं मी श्री कृष्णाच्या भूमिकेतून शिकलो ते म्हणजे ‘आताच क्षण जगून घ्या.. पुढे काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही कल हो ना हो!
Discussion about this post