हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या सिनेइंडस्ट्रीत फार कमी लोक अशी आहेत जी समाज प्रबोधन करणाऱ्या विषयांवर बोलू पाहतात. सध्या सिनेसृष्टीलाही त्यामुळे एक वेगळं वळण मिळालं आहे. प्रेक्षक वर्ग देखील अशा विषयांना फार आत्मीयतेने पाहतात आणि एक कथा म्हणून नव्हे तर एक वास्तव म्हणून या कथा जगतात. अशीच एक कथा घेऊन प्रसिद्ध मद्रासी दिग्दर्शक रणजिथ अण्णा प्रेक्षकांसमोर येणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या कथानकाचा एक टिझर व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे यात कोणताही मोठा आणि दिग्गज असा कलाकार नाही. पण कथानकाची सुंदरता हाच याचा मोलाचा भाग.
या व्हायरल टिझर व्हिडिओत आपण एक प्रसंग पाहू शकतो. या प्रसंगात, एक लहान मुलगी बुद्धाच्या खांद्यावर बसून आकाशाकडे निरागसपणे पाहत आहे. दरम्यान वडील मुलीला म्हणतात, ‘वेडी झालीयेस का..? देवाच्या अंगावर चढतेस…?’ यावर मुलगी उत्तर देते कि, ‘बुद्धाने सांगितले आहे की तो देव नाही, तुम्ही त्याला (बुद्ध) देव का म्हणता?’ अशा अनंताच्या सत्य शोधासाठी एक स्त्री बुद्धाने सांगितलेला मार्ग अनुसरतेय हे समाजाला कितपत मान्य असेल..? या प्रसंगाची सांगड याच विचारांसोबत घालण्यात आली आहे.
कारण प्रसंगातील वडील मुलीला सांगत असतात ‘तू खाली उतर देवावरून.. आणि मुलगी त्यांना सांगत असते कि, ‘बुद्धानेच सांगितले आहे की इथे कोणी देव नाही आणि पुढे एक निरागस प्रश्न विचारते कि, ‘तुम्ही बुद्धांना देव का म्हणता.?’ या कथेचा काहीसा आशय या व्हिडिओतून समोर येतो. पण हि कथा नेमकं काय शिकवू पाहते हे समजण्यासाठी ती पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
हा प्रसंग दिग्दर्शक पा रंजित यांच्या ‘धम्मम’ या चित्रपटातील आहे. हा प्रसंग अत्यंत मार्मिक आणि विचार करायला लावेल असा आहे. यातील मूळ मुद्दा हा आहे की, आपण ह्यातून काय शिकणार आहोत..? धार्मिक प्रतीकांचा अपमान झाला म्हणून जिवंत माणसांना संपवण्याची आपली मानसिकता कधी संपेल..? हा यातील एक संशोधनाचा विषय आहे. या विषयाला अनुसरून हि कथा बरंच काही बोलून जाते. बौद्ध हा एक धर्म मानला जातो. पण हा एक धर्म नसून हि एक भावना आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. संशोधनकर्त्यांनीदेखील बौद्ध या भावनेला पुरस्कृत अभिमान दिला आहे.
Discussion about this post