हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ९० च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक असे उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. करिश्माने आता वेबसिरीज मध्ये डेब्यू केला आहे जिथे तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
बॅक-टू-बॅक म्युझिकल्स देण्याचे श्रेय असलेले नव्वदचे दशकातील बॉलिवूडचा राणी आता अल्ट बालाजी आणि झी ५ च्या २०२० मधील सर्वाधिक प्रलंबीत वेब सीरिज ” मेंटलहुड ” च्या माध्यमातून प्रेक्षकांची आणि खासकरुन त्याच्या चाहत्यांची मने जिंकन्यासाठी परत आली आहे.
या डिजिटल सिरीज मध्ये डिनो मोरेया, संजय सुरी, संध्या मृदुल, शिल्पा शुक्ला आहेत. ११ मार्चपासून लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून हा शो कौतुकाचा विषय ठरला आहे.
डिजिटल शो समीक्षक, बॉलिवूड, करिश्माच्या कुटूंबियांनी आणि विशेषत: तिच्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
करिश्माच्या स्टार पॉवर मुळे मेंटलहुड भारतीय आणि ग्लोबल यादीमध्ये प्रथम क्रमांकावर ट्रेंडिंगला आहे.
सकारात्मक प्रतिक्रियेवर भाष्य करताना करिश्मा कपूर म्हणाली- “शोला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेले आहे. मी माझ्या प्रेमळ चाहत्यांना आणि आणि शोचे कौतुक करणाऱ्या प्रेक्षकांचे पूर्णपणे आभारी आहे. या कार्यक्रमाला हो म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा एकताने माझ्याशी संपर्क केला तेव्हा
स्वत: आई असल्यामुळे मला प्रत्येक स्त्री, आई आणि आई बनणाऱ्या स्त्रियांना मातृत्व माहित व्हावे आणि मातृत्व किती विशेष आहे याची जाणीव करून द्यायची होती.आणि तसेच पालकत्वामधील उतार चढाव यांची देखील माहिती करून द्यायची होती. “
करिश्मा पुढे म्हणते- “मला सर्व माता, बायका, मुली आणि पुरुषांना सांगायचे होते की ते एकटे नाहीत.” हा शोचा मूलभूत आधार असल्याने मी मेंटलहुडचा एक भाग होण्याचे मान्य केले. या शोने भारत आणि परदेशातील दर्शकांचे लक्ष वेधून घेतले याचा मला आनंद आहे आणि मला आशा आहे की लोक हा कार्यक्रम पाहतच राहतील आणि यापुढेही त्यांना आवडतील. “