Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत पोहोचल्या; जाणून घ्या कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आजही प्रेक्षकांच्या मनामनांत वास करतात. त्यामुळे अलका कुबल यांच्या बाबतीतले अपडेट घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असल्याचे दिसून येते. तर अभिनेत्री अलका कुबल यांनी काल अर्थात रविवारी दिनांक ८ ऑगस्ट २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे. हि भेट बारामती येथील “गोविंदबाग” या पवारांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरदेखील उपस्थित होते. तूर्तास तरी ही भेट औपचारिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Alka Kubal, the Marathi actress, visits Sharad Pawar at her home in Govindbag#AlkaKubal #SharadPawar #RamrajeNimbalkar https://t.co/7xctJdDSIL

— Pen News India (@PenNewsIndia) August 9, 2021

साधारण वर्षभरापूर्वी “आई माझी काळूबाई” या सोनी टीव्हीवर प्रक्षेपित होणाऱ्या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान सेटवरील अनेक कलाकारांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती आणि मराठी सिनेइंडस्ट्रीने त्यांच्या निधनाचा धक्का पचवला. आशालता बावगावकर यांचे कोरोनामुळे निधनझाल्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणावरही त्याचा परिणाम झाला होता. दरम्यान तातडीने चित्रीकरण थांबविण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सेटवरील सर्व कलाकारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती आणि त्यांना भेटीचे निमंत्रण दिले होते.

View this post on Instagram

A post shared by Marathi Entertainment Media (@marathientertainmentmedia)

या भेटीमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. तर हि भेट औपचारिक असल्याचे माध्यमांना सांगण्यात आले आहे. मात्र, या भेटीमध्ये अलका कुबल आणि शरद पवार यांच्यात आगामी प्रोजेक्ट संदर्भात बरीच चर्चा झाली. दरम्यान, अलका कुबल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन मालिकांचे चित्रीकरण, कोरोनामुळे येणार्‍या अडचणी आणि आगामी प्रोजेक्ट संदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी सांगितले की, पवार साहेबांबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांनी ग्रामीण भागाकडे चित्रिकरण करावे, असा आग्रह पवार साहेबांनी व्यक्त केला आहे.

#Exclusive @sonymarathitv 's Upcoming #Vaidehi To Replace Popular Show #AaiMajhiKalubai ???!!

.
.
.
. pic.twitter.com/l3QLpKXxRT

— bangla_telly_update (@m_tellyworld) July 14, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी, पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे चित्रपट आणि मालिका निर्मात्यांनी शहरात चित्रीकरण करण्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन स्थळे आणि गावागावांमध्ये असलेल्या लोकेशनचा देखील वापर करावा. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल, असे आवाहन केल्याचे कुबल यांनी सांगितले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह निर्माते-दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेत्री प्राजक्ता दिघे, आ. मकरंद आबा पाटील, निखील घाडगे आदी उपस्थित होते.

Tags: Alka Kuba;Marathi ActressNationalist Congress PartySharad Pawar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group