हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर सध्या Y ची चर्चा जोरदार रंगली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींनी Y लिहिलेल्या पोस्टरसह फोटो शेअर केला आहे. पण या पोस्टर्सचा नक्की अर्थ आहे तरी काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर याच उत्तर आहे ‘वाय’. होय. सर्व सामान्यांच्या कल्पनेबाहेर असणाऱ्या ‘ती’च्या लढ्याची गोष्ट घेऊन ‘वाय’ येतोय. हा चित्रपट येत्या २४ जून २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि एका थरारक वास्तवाशी तुमची भेट करून देण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केले आहे आणि याच्या पोस्टरची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर आहे.
या चित्रपटात मुख्य आणि महत्वाच्या भूमिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ‘वाय’ चे पोस्टर हातात धरलेला एक फोटो शेअर केला. यानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी असेच काही पोस्टर शेअर केले आहेत.
अभिनेता स्वप्निल जोशीसह नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी यासारख्या अनेक दिग्गज आणि आघाडीच्या कलाकारांनीही ‘वाय’ चे पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/Cdh1pzgjvnl/?utm_source=ig_web_copy_link
या सर्वच कलाकारांनी हे पोस्टर शेअर करताना लिहिले आहे कि, ” माझा पाठिंबा आहे ! आपला ” ? ” या प्रश्नाने नेटकरी आणखीच संभ्रमित झाले आहेत. शिवाय अनोखे नाव ‘वाय’ या चित्रपटाबद्दल उत्कंठता निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे.
आपल्या नव्याकोऱ्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते कि, ” ‘वाय’ चा अर्थ काय हे चित्रपटातून कळेलच. ‘वाय’ हे केवळ एक अक्षर नसून त्यामागे स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा लढा आहे ” ‘वाय’ चे दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात, ” वाप या अक्षरामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. हाच संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही ‘वाय’ मधून करत आहोत आणि यात आम्हाला मराठी सिनेसृष्टीची साथ मिळतेय, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.”
Discussion about this post