Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दुःख व्यक्त करण्याचा हा कोणता प्रकार?; अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर हळहळणारा सिद्धार्थ शुक्ला झाला ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Siddharth Shukla
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणारा रिऍलिटी शो बिग बॉसच्या १३व्या सिजनचे विजेतेपद पटकाविलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे. कधीकाळी केवळ टीव्ही मालिकांमुळे चर्चेत असणारा सिद्धार्थ बिग बॉसनंतर चांगलाच चर्चेतही आला आणि लोकांच्या लक्षातही राहिला. त्यानंतर आता सिद्धार्थचे संपूर्ण देशभर चाहते आहेत. नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असणारा सिद्धार्थ चाहत्यांच्या कौतुकात नाहताना दिसतो. मात्र यावेळी मिस्टर शुक्ला चक्क ट्रोल होत आहे. कारण असे कि, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दु:ख व्यक्त करणारी एक पोस्ट त्याने शेअर केली. पण नेटक-यांना त्याचा हा अंदाज काही भावला नाही आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फ्रेम मधला स्वतःचा फोटो शेअर केला. या फोटोत सिद्धार्थ त्याच्या डोक्याला हात लावून खिन्न, सुन्न आणि अतिशय उदास चेह-याने बसलेला दिसतोय. हा फोटो शेअर करीत त्यासोबत सिद्धार्थने कॅप्शन लिहिताना म्हटले आहे कि, ‘ अफगाणिस्तानमधली परिस्थिती पाहून खूप हताश झालोय. खरंच माणूसकी जिवंत आहे का?’ त्याची हि पोस्ट पाहून त्याच्या कित्येक चाहत्यांनी देखील अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर दुःख व्यक्त केले आहे. तर इतरत्र नेटकऱ्यांना मात्र सिद्धार्थचा दुःख व्यक्त करण्याचा हा अंदाज बुद्धीला काही पटलेला दिसत नाही. हे या पोस्टवरील कमेंट्सवरून सहज लक्षात येते. गेल्या ४ दिवसांपासून सिद्धार्थ फक्त आणि फक्त ट्रोल होताना दिसतोय.

 
अनेकांनी या पोस्टमुळे सिद्धार्थ शुक्लाला ट्रॉल केल्याचे दिसून येत आहे. दुःख व्यक्त करण्याचा हा कोणता प्रकार? असे म्हणत एका नेटकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. तर अन्य एकाने म्हटले कि, इथेही नाटक सुरू?. शिवाय पोज देऊन दु:ख कशासाठी? सहानुभूती दाखवायचीच तर त्या पद्धतीने व्यक्त कर ना, ही फालतुगिरी कशासाठी? असे म्हणत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. इतके दु:ख झालेय तर एखादे ट्विट करू शकला असता, दु:खी फोटो अन् कॅप्शनची काय गरज होती? असेही एकाने म्हटले आहे. या दरम्यान सिद्धार्थचे चाहते त्याची पाठराखण करताना दिसले आहेत. ‘काही कलाकार अशा मुद्द्यावर एक अक्षरही बोलत नाही. पण तू नेहमीच सत्याच्या बाजुने असतोस,’ अशा कमेंट्स करत त्याचे चाहते त्याची करताना दिसत आहेत.

Tags: Afganistan CrisisInstagram Postsiddharth shuklaSocial Media Trollingviral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group