हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉलिवूड स्टार सलमा हायेक हिने नुकताच २ सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केला. तिने रेड बिकनी मधील आपला एक विडिओ इंस्टाग्राम वर शेअर करत आपला वाढदिवस साजरा केला होता. पण तुम्हाला माहित आहे का ? सलमा हायेक ओळखली जाते ते आपल्या मानवतावादी म्हणून… अशीच एक घटना घडली होती २००८ मध्ये, जेव्हा सलमा हायेकने एका अनोळखी व्यक्तीच्या भुकेल्या बाळाला स्तनपान दिले होते.
नेमकं काय घडल होत-
सलमा हायेक सप्टेंबर 2008 मध्ये आफ्रिकन धर्मादाय मिशनमध्ये भाग घेण्यासाठी सिएरा लिओनला परत आली . हॉस्पिटलमध्ये फिरत असताना तिला एक आई दिसली जिचे दूध संपले होते. तेव्हा खरं तर सलमा हायेक याना एक वर्षाची मुलगी होती, सलमा यांनी लगेच त्या अनोळखी व्यक्तीच्या कुपोषित एका आठवड्याच्या मुलाला घेतले आणि तिच्या आजूबाजूला अनेक कॅमेरा कर्मचारी असूनही त्याला स्तनपान करायला सुरुवात केली.
स्तनपानाच्या घटनेनंतर, तिने कबूल केले की त्या बाळाला दूध देऊन तिच्या स्वत: च्या मुलीशी विश्वासघात केला असावा अशी संमिश्र भावना तिच्या मनात आली होती. परंतु नंतर तिला वाटले की तिच्या मुलीने तिचे दूध शेअर करण्यास कोणतीही हरकत केली नसती उलट त्या बाळाला स्तनपान केल्याचा माझ्या मुलीला अभिमानच वाटलं असता असं सलमा हायेकने म्हंटल. तसेच तिने असेही सांगितले की जेव्हा तिची मुलगी मोठी होईल तेव्हा ती तिला एक उदार आणि काळजी घेणारी व्यक्ती बनण्यास प्रोत्साहित करेल. आणि ती अभिमानाने पुढे म्हणाली, “मला वाटते की आई म्हणून मी तिला देऊ शकेन हीच सर्वोत्तम गोष्ट आहे.”
Discussion about this post