Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडकर गेले भुर्रर्रर्र; जाणून घ्या कोण गेलंय कुठे फिरायला?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 31, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bollywood Celebrities
0
SHARES
461
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज ३१ डिसेंबर २०२२… या वर्षातील शेवटचा दिवस. उद्याचा सूर्य एका नव्या वर्षाच्या स्वागतासह नवे चैतन्य, नव्या संधी आणि नवे संघर्ष घेऊन येणारे असेल. या वर्षात प्रत्येकाने अनेक प्रसंग पाहिले. काही चांगले काही वाईट अशा प्रत्येक प्रसंगासह आयुष्याची गाडी पुढे ढकलणारे आपण आणखी एका वर्षाला आता निरोप देत आहोत. संपूर्ण जगभरात ३१ डिसेंबर या दिवसाचे काही खास प्लॅनिंग केले जातात. कुणी घरातल्या घरात सेलिब्रेशन करत असतं. तर कुणी बाहेरगावी किंवा अगदी परदेशात सेलिब्रेशन करत असत. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि आपले लाडके बॉलिवूड सेलिब्रिटी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कुठे आणि कोणासोबत गेले आहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि आगामी वर्षाचे स्वागत कारण्यासाठी सगळेच काही ना काही प्लॅनिंग करत असतात. मग यामध्ये सेलिब्रिटी कसे काय मागे राहतील..? तर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आपल्या खास आणि जवळच्या व्यक्तींसोबत परदेशात विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. कुणी आपल्या फॅमिलीसोबत, तर कुणी आपल्या पार्टनरसोबत, इतकेच काय तर कुणी आपल्या टू बींसोबत फिरायला गेले आहेत. आता हे सेलिब्रिटी नक्की कुठे फिरायला गेले आहेत ते आपण जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यन – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन न्यू इयर सेलिब्रेशनसाठी एकटाच पॅरिसला रवाना झाल्याचे समजत आहे. तशी त्याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने फोटो शेअर केल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुल प्रीत सिंग – बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग न्यू इयर सेलिब्रेशनसाठी छानसं डेस्टिनेशन फुकेत गाठलं आहे. हे थायलंडच्या जवळ असलेलं एक बेट आहे. रकुलने शेअर केलेल्या फोटोतून या बेटाचे काहीसे सौंदर्य आपल्याला पाहता येईल.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती सॅनॉन – बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन न्यू इयर सेलिब्रेशनसाठी आपल्या मित्र मंडळींसह मालदीवला गेली असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी ती आणि प्रभास एकत्र सेलिब्रेशन करणार असल्याचीही चर्चा होती.

 

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खान, इब्राहिम खान आणि अमृता सिंग – सारा अली खान तिची आई अमृता आणि भाऊ इब्राहिमसोबत लंडनमध्ये फिरायला गेल्याचे समजत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या फॅमिलीचा व्हॅकेशन मोड ऑन आहे. या ट्रिपदरम्यानचे बरेच फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

सैफ अली खान आणि करिना कपूर खान – बॉलिवूडचं हटके आणि ट्रेंडिंग कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे त्यांची मूलं तैमूर आणि जेहला घेऊन स्वित्झर्लंडमध्ये न्यू इयर सेलिब्रेट करणार आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ कौशल – विकी आणि कॅट यांनी फॅमिलीसोबत ख्रिसमस एन्जॉय केल्यानंतर थेट राजस्थान गाठलं आहे. इथल्या जंगलात फिरतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ कॅटरिनानं शेअर केले आहेत. हे जोडपं आपले न्यू इयर सेलिब्रेशन इथेच करणार असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Edits For VarunNatasha (@natashadalaldvn)

वरुण धवन आणि नताशा दलाल – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे दोघेही भारताबाहेर परदेशात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी गेल्याचे समजत आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्यांना स्पॉट केलं गेलं.

 

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी रॉय आणि सूरज नांबियार – नवविवाहित जोडी अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार हे येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आबू धाबीला गेले आहेत. मौनीने येथील काही फोटो शेअर केले आहेत. हे कपल एकत्र त्यांचं पहिलं न्यू इयर सेलिब्रेशन इथेच करणार आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी – बॉलिवूडची ट्रेंडिंग जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्ड्स एकत्र न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दुबईला गेले आहेत. इथे ख्रिसमस पार्टी एन्जॉय करतानाचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने शेअर केले होते.

Tags: bollywood actorBollywood ActressBollywood CelebritiesCelebrating New YearInstagram Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group