हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त हेमांगी कवीचा बोलबाला आहे. कारण कोणतीही महिला ज्या विषयावर कधीच उघड बोलत नाही किंवा साधी व्यक्त सुद्धा होत नाही अश्या विषयाला हेमांगीने मात्र कंठ फोडला आहे. ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या फेसबुक पोस्टच्या निमित्ताने हेमांगीने या विषयाला मुळापासून हात घालत एक स्त्री म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पोस्टनंतर तिला अनेको कलाकारांनी चांगलाच पाठिंबा दिला. यात सगळ्यात पुढे मराठी लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा समावेश होता. मुळात हा विषय इतक्या सहजोगत्या मांडणे हि निश्चितच मोठी बाब आणि आजच्या काळाची गरज आहे. मात्र तिची हि पोस्ट पाहून आणि कलाकारांचे समर्थन पाहून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया मांडली आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराज महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा तू कुठे होतीस? आणि आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवलं तेव्हा तू कुठे होतीस असा सवाल तृप्ती यांनी उपस्थित केला आहे. तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आपली भूमिका अत्यंत परखड स्पष्ट केली आहे. ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरं जावं लागलं. पण त्यावेळी आम्हाला तर प्रवीण तरडे, हेमांगी कवी कोणीच जाहीर पाठिंबा दिला नाही, असा मारक टोला त्यांनी साचेबद्ध शैलीत लगावला आहे. “जेव्हा मासिक पाळीच्या विषयावरुन दुजाभाव केला जातो, बंदी घातली जाते तेव्हा आम्ही आंदोलनं केली, पण अशा वेळी हे लोक का साथ देत नाहीत”, अशी खंतदेखील देसाईंनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केली आहे. पुढे, आपण यावर्षीपासून महाराष्ट्रात नो ब्रा डे साजरा करण्याचा विचारात आहोत. जेव्हा हा दिवस साजरा करु तेव्हा तुम्ही स्वतःहून यात सहभागी व्हाल अशी अपेक्षा आहे असेही देसाईंनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये हेमांगी कवीला टॅग केलं असून तिची पोस्टदेखील शेअर केली आहे.
आणखी एक खंत व्यक्त करण्यासारखी बाब अशी कि, कधीही कुणीही न बोलल्या जाणाऱ्या कोणत्या विषयाला हात घातला आणि आपले मत व्यक्त केले कि अनेकांना ट्रोलिंग साठी एक आयते शिकार मिळते. याबाबतीतही तसेच काहीसे आहे. अनेकांनी जेव्हा हेमांगीच्या या मुद्देसूद मांडणीच्या विचारांचे स्वागत केले तेव्हा एका चौकटीत बंद असलेला समाज विकृत भावनेने उफाळला आणि त्यांनी आपली असहमती दर्शविली आहे. इतकेच काय तर आता तृप्ती देसाईंनी व्यक्त केलेल्या भावना आणि विचारलेल्या प्रश्नांवर अनेकांनी त्यांचीच उलट विचारणी सुरु केली आहे. अनेकांनी विविध भाषेचा प्रयोग करत अर्वाच्य पद्धतीने या दोन्ही महिलांवर निशाणा साधला आहे. मात्र आजची पिढी सजग आहे. नव्या आणि योग्य विचारांचा सत्कार आणि अयोग्य विचारांचा तिरस्कार करणे जाणते. त्यामुळे जग कितीही मागासल्यासारखे वागले तरी आपले विचार आणि आचरण दोन्ही पुढारलेले असेल याची दक्षता आपणच घ्यावयाची आहे.
Discussion about this post