हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याचा सुवर्णदशक सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे खास आकर्षण असे कि, यात मराठी सिनेसृष्टीसाठी उल्लेखनीय ठरलेल्या गेल्या १० वर्षांतील उत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला आहे. रसिकांनी नोंदवलेल्या सर्वोच्च मतानुसार सुवर्णदशक सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार ‘सैराट’ चित्रपटाच्या नावावर झाले आहेत. होय. यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट नायिका, फेव्हरेट दिग्दर्शक, सवोत्कृष्ट गाणे हे सर्व पुरस्कार जिंकून सैराटने बाजी मारली आहे.
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार प्रत्येक कलाकारासाठी एक वेगळा आनंद आहे. त्यात फेवरेट चित्रपट ‘सैराट’ ठरल्यानंतर कलाकारांच्या आनंदाला उधाण आले. त्यात ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची पात्रासाठी रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट नायिकेचा बहुमान मिळाला. याशिवाय फेवरेट दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांना ‘सैराट’ चित्रपटासाठीच पुरस्कृत करण्यात आले. यासोबत ‘सैराट’ मधील अत्यंत लोकप्रिय ठरलेलं गाणं ‘झिंगाट’ सर्वेत्कृष्ट गाणं ठरलं. तर ‘झिंगाट’ गाण्यासाठी अजय- अतुल यांना फेवरेट गायक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याशिवाय ‘लय भारी’ या चित्रपटासाठी रितेश देशमुख याला सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार मिळाला. तर फेवरेट सहाय्यक अभिनेता म्हणून अंकुश चौधरी याला ‘दुनियादारी’ चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच सहाय्यक अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिला ‘क्लासमेट’ या चित्रपटाकरीता गौरविण्यात आले.
यानंतर कमाल अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक हा पुरस्कार प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासाठी पटकावला. या व्यातिरिक्त ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातील ‘हृदयात वाजे समथिंग’ या गाण्यासाठी आर्या आंबेकरला फेवरेट गायिकेचा मान मिळाला. याशिवाय पॉप्युलर फेस म्हणून सोनाली कुलकर्णी तर फेवरेट स्टाइल आयकॉन म्हणून रितेश देशमुखला पुरस्कृत करण्यात आले.
Discussion about this post