Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अपूर्वाच्या किंकाळीने प्रेक्षकांचा थरकाप; बिग बॉस मराठीच्या घरात नक्की झालं तरी काय..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 5, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
3.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारपासून टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सुरु झाला आहे. हा शो सुरु होऊन अगदी दोन तीन दिवसच झाले आहेत. तोच खेळात विविध स्पर्धकांचे विविध रंग दिसायला लागले आहेत. काही दिवसांतच इथल्या स्पर्धकांची शस्त्र बाहेर आली आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात एक मजेदार टास्क दिला आहे आणि हा टास्क जिंकण्यासाठी कुणीही काहीही करायला तयार आहे. पण या टास्कचा एक प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये स्पर्धक अपूर्वा नेमळेकरची जोरात किंकाळी ऐकू येते. मग इथे नक्की झालं तरी काय..? असा सवाल उभा राहतो.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या बिग बॉस मराठी ४ च्या घरात धडक- बेधडक हा बुद्धी आणि शक्तीशी संबंधित टास्क सुरु आहे. ज्यामध्ये सगळ्यांचाच गोंधळ उडालेला दिसून आला आहे. यात घरातील एक सदस्य अगदी पहिल्याच टास्कमध्ये जखमी होता होता वाचला. धडक- बेधडक हा टास्क आज प्रेक्षकांना पाहता येईल. यात सदस्यांची उडालेली भांबेरी तुम्ही पाहू शकाल. यामध्ये कोणी जीव तोडून पळतंय तर कोणी जीवघेणी किंकाळी फोडतंय. या टास्कमध्ये घरातील एका महिला सदस्याला उंच टेबलावरुन दणकन जमीनीवर पडल्यामूळे जबर मार लागला आहे. हि सदस्या आहे मेघा घाडगे. तिला असं पडताना पाहून बाजूला उभ्या असलेल्या अपुर्वा नेमळेकरने फोडलेली किंकाळी प्रोमोत ऐकू येते आणि अक्षरशः थरकाप उडतोय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

धडक- बेधडक हे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील पहिले साप्ताहिक कार्य आहे. त्यामुळे जो तो चुरशीने लढतोय. यामध्ये चार- चार सदस्यांचे गट आपापल्या ग्रुपसाठी खेळतील. एका स्लाइड्वरुन साहित्य पाठविले जात आहे. हे साहित्य स्लाईडजवळ असणाऱ्या स्पर्धकांनी जास्तीत जास्त गोळा करायचे आहे. असे हे कार्य पूर्ण करताना मेघा घाडगेचा टेबरवरून घरंगळत पडून छोटा अपघात झाला. यावेळी अपूर्वाने ‘अरे ती पडतेय तिला धरा’ असे म्हणत जोरात किंकाळी मारली आणि यामुळे पाहणारेही थक्क झाले. या अपघातात मेघाला बऱ्यापैकी मार लागल्यामुळे पहिल्याच कार्याला गालबोट लागल्याचे दिसून आले. हा एपिसोड आज रात्री कलर्स मराठीवर प्रेक्षकांना पाहता येईल.

Tags: Apurva Nemlekarcolors marathiInstagram Postmegha ghadgePromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group