हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीत सृष्टीत आपल्या बहारदार संगीतामुळे ओळखले जाणारे जेष्ठ संगीतकार आणि पॉप गायक बप्पी लहिरी यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी बप्पी दा यांनी जगाचा निरोप घेतला. साधारण ४८ वर्षे त्यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान पक्क केलं. बप्पी दा यांची स्वतःची अशी एक विशेष ओळख होती. निश्चितच त्यांचा आवाज हि त्यांची पहचान होतीच.
पण याशिवाय त्यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखलं जायचं. याच कारण म्हणजे बप्पी दा याना गळ्यात सोन्याच्या कित्येक टोळ्यांच्या चैनी आणि बोटांमध्ये अंगठ्या, मनगटात कड अशा विविध दागिन्यांची भरपूर आवड होती. त्यामुळे नेहमीच त्यांच्या चाहत्यांना याबाबत प्रश्न पडायचा. कि बप्पी दा एव्हडे सोन्याचे दागिने का घालत असतील..? तर आज आपण याबाबत जाणून घेऊया.
बप्पी दा यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. त्यामुळे अनेकदा त्यांना यामागील कारण विचारले जायचे. एकदा एका मुलाखतीत शेवटी त्यांनी यामागील कारण सांगितेलच. बप्पी दा म्हणाले होते की, ते अमेरिकन स्टार एल्विस प्रेस्लीचा मी खूप मोठा चाहता आहे. मी एल्विसला प्रत्येक परफॉर्मन्समध्ये सोन्याची चैन घातलेला पाहिले आहे.
तेव्हा मी स्ट्रगल करत होतो पण मी निश्चय केला होता की, यशस्वी झाल्यावर मीपण खूप सोनं घालणार. त्यामुळे यशस्वीतेची पायरी चढल्यानंतर बप्पी दा यांनी अंगावर इतकं सोनं घातलं कि त्यांची ओळख भारताचा गोल्ड मॅन म्हणून झाली. याशिवाय बप्पी दा म्हणाले होते कि, सोनं माझ्यासाठी खूप भाग्यवान ठरले. त्यामुळे मी ते घालणे कधीच सोडू शकत नाही.
माहितीनुसार, बप्पी दा यांच्याकडे सुमारे ५० लाखांचे सोने असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे २० कोटी रुपये इतकी आहे. तसेच बप्पी दा यांची पत्नी चित्रा यांच्याकडे तर ९६७ ग्रॅम सोने, ८.९ किलो चांदी आणि ४ लाख रुपये जास्त किंमतीचे हिरे आहेत. बप्पी लहरी यांची भरपूर गाणी हिट आहेत. यामध्ये ‘याद आ रहा है’, ‘सुपर डान्सर’, ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त’, ‘ऐसे जीना भी क्या जीना है’, ‘प्यार चाहिए मुझे जीने के लिए’, ‘रात बाकी’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘उह ला ला उह लाला’ ही आणि इतर बरीच गाणी आहेत.
Discussion about this post