Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हिंसेमुळे शोमधून हकालपट्टी झालेली अर्चना गौतम BIGG BOSS हाऊसमध्ये परतणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 12, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बिग बॉसच्या १६ व्या सिजनमधला सगळ्यात मोठा राडा पहायला मिळाला. ज्यामध्ये घरातील सदस्य अर्चना गौतमला राग अनावर झाला आणि त्या नादात ती हाणामारीवर उतरली. परिणामी तिला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढलं गेलं. पण सोशल मीडियावर मात्र एकदम उलट वारे वाहत आहेत. ज्यामध्ये बऱ्यापैकी नेटकरी अर्चनाच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. तिने केलेले कृत्य चुकीचे असले तरीही तिला एक संधी मिळायला हवी असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. यामुळे कदाचित अर्चना गौतम बिग बॉस हाऊसमध्ये परतण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं कि, टिश्यूच्या बॉक्सेसवरून अर्चना आणि टीना एकमेकींसोबत भिडल्या. ज्यामध्ये घरातील सगळेच सदस्य मध्ये पडताना दिसले. यावेळी शिव देखील मध्ये पडला आणि त्याने अर्चनाचा एक शब्द उचलून धरला. ज्याचा अर्चनाला राग आला आणि तिने थेट शिवचा गळा धरला. यावेळी इतर सदस्यांनी तिला मागे ओढलं आणि दोघांच्या मध्ये उभे राहिले. पण एव्हाना शिवला तिची नखं लागली होती. जे पाहून घरातील सगळेच सदस्य चिडले आणि प्रत्येकाने अर्चनाला बाहेर काढा अशी मागणी केली. साहजिकच बिग बॉसचा मुख्य नियम हिंसा न करणे असाच आहे ज्याचे उल्लंघन झाले आणि यामूळे बिग बॉसने तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या सगळ्या प्रकरणात अर्चना गौतमला घरातील सदस्यांनी दोषी करार दिला. इतकेच काय तर ती चुकली आहे हे बिग बॉसनेदेखील मान्य केले आणि तिला घराबाहेर काढले. पण घराबाहेरील स्थिती थोडी वेगळी आहे. यावेळी अर्चनाने केलेले कृत्य चुकीचे आहे, मात्र तिला हे करायला शिवने भाग पाडले असे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे जेव्हढे नेटकरी अर्चनावर ताशेरे ओढत आहेत. तेव्हढेच नेटकरी शिवचीही खरडपट्टी काढताना दिसत आहेत. अर्चनाशी संबंधित पॉलिटिकल पार्टी, पक्ष किंवा पक्ष श्रेष्ठी यांच्याबद्दल शिवकडून वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलले गेल्यामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे अर्चनाइतकाच तोही दोषी आहे. त्यामुळे अर्चनाला शोमध्ये परत आणा. ती या शोची जान आहे. ती नसेल तर बिग बॉस पाहणार नाही. असे नेटकरी बोलताना दिसत आहेत.

Tags: Archana GautamColors TVInstagram PostShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group