हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना येऊन गेल्यापासून प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म मनोरंजासाठी बेस्ट पर्याय वाटू लागले आहेत. त्यामुळे ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सिरीज, शो आणि चित्रपटांना देखील एक वेगळीच लोकप्रियता मिळते. दरम्यान क्राईम वेब सीरिजच्या विश्वात मिर्झापूर या वेब सीरिजची लोकप्रियता तुफान आहे. त्यामुळे मिर्झापूरचे दोन सीजन गाजल्यानंतर प्रेक्षक वारंवार या वेब सीरिजच्या तिसऱ्या सिजनबाबत विचारत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या वेब सिरीजच्या प्रदर्शनावरून वाद सुरु आहेत. ज्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
How can there be pre-screening committee for web series? #SC refuses to order stay on #MirzapurSeason3 https://t.co/lST3NvppuY
— DNA (@dna) October 13, 2022
क्राईम वेब सीरिजमध्ये मिर्झापूरचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. सेक्रेड गेम्स या मालिकेला मागे टाकून या वेब सीरिजने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. या वेब सीरिजचे कथानक, यातील पात्र, कलाकारांचा अभिनय, हटके डायलॉग हे सगळं काही प्रेक्षकांच्या पथ्थ्यावर पडलं आहे. त्यामुळे या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. यामुळे मिर्झापूरचे दोन सीजन येऊन गेल्यावर प्रेक्षकांमध्ये तिसऱ्या सिजनबाबत वेगळीच उत्सुकता पाहायला मिळाली. मात्र या वेब सिरीजवर आक्षेप घेत काहींनी तिसऱ्या सिजनवर बंदी यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने आला निर्णय दिला आहे.
याचिकेवर बोलताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनवर बंदी घालता येणार नाही वा त्याचे प्रदर्शन रोखता येणार नाही. कोर्टाला याबाबतीत आश्चर्य वाटते कि, ज्यावेळी एखादी मालिका ही ऑनलाईन प्रदर्शित होते तेव्हा त्याच्यासाठी एखादी प्री स्क्रिनिंग कमिटी कशी काय असू शकते..? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय उमेश ललित आणि बेला एम त्रिवेदी यांनी मिर्झापूरमध्ये राहणाऱ्या सुजीत कुमार सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आपला निर्णय देत याचिकाकर्त्याला आपली याचिका मागे घेण्याचा आदेश दिला आहे. यामुळे आता निर्माते, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Discussion about this post