हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येकाच्या लहानपणी त्यांचा आवडता सुपरहिरो असतोच ना. आमचाही होता. तुमचाही असेल.. नाही का..? मग ‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘वंडर वूमन’ का मग ‘शक्तिमान’..? ९०च्या काळातील मुलांचा एकदम देसी आणि लोकप्रिय हिरो म्हणजे शक्तिमान. DD नॅशनलवर एक प्रसिद्ध टीव्ही मालिका प्रसारित व्हायची जिचं नाव ‘शक्तिमान‘ होतं. हि मालिका अशी आहे जी अजूनही लोकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील नायक लहान मुलांसाठी सुपर हिरो कधी झाला तेच कळलं नाही. यानंतर आता हा सुपरहिरो मोठ्या पडद्यावर वेगळ्या अवतारात येतोय. पण या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे एक गूढच होत. यांनतर आता रणवीर सिंगच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे.
After the super success of our many superhero films in India and all over the globe, it's time for our desi Superhero! pic.twitter.com/Cu8bg81FYx
— Sony Pictures Films India (@sonypicsfilmsin) February 10, 2022
बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अभिनेता रणवीर सिंगचं नाव येतच येत. कारण रणवीर कुठलाही चित्रपट करताना आणि कुठलीही भूमिका साकारताना जीव ओतून काम करतो. त्याचा उत्साह अगदी वाखाडण्याजोगा असतो. मग ती भूमिका अगदी कोणतीही असो…. हुल्लड गुंडा किंवा मग पेशवा बाजीराव. याशिवाय रणवीरने साकारलेला अलाउद्दीन खिलजी त्याची चर्चा तर अजूनही होते. रणवीरने प्रत्येक पात्रांत आणलेला जीवंतपणा हा प्रेक्षकांसाठी विलक्षण अनुभव घेऊन येतो. त्यामुळे टेलिव्हिजनवरील सुपरहिट शो शक्तिमानवर येणाऱ्या चित्रपटासाठीसुद्धा सोशल मीडियावर रणवीरच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे.
DD नॅशनल वर प्रसारित होणारी ‘शक्तिमान’ ही मालिका १३ सप्टेंबर, १९९७ रोजी टेलिकास्ट झाली होती. या मालिकेने २७ मार्च, २००५ पर्यंत छोट्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेत मुकेश खन्ना यांच्याव्यतिरिक्त किटू गिडवानी आणि वैष्णवी महंत मुख्य भूमिकेत होते. यानंतर ही मालिका लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा टेलिकास्ट करण्यात आली होती. याहीवेळी या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. माहितीनुसार, तेव्हाच निर्माते या सिनेमाची निर्मिती करण्याची योजना बनवत होते. आता निर्मात्यांनाही शक्तिमानची भूमिका रणवीर उत्तम साकारेल असे वाटू लागले असावे. त्यामुळे चित्रपटात शक्तिमानच्या भूमिकेत रणवीर दिसण्याची शक्यता जास्त आहे.
Discussion about this post