हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी सब वरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. या मालिकेने २८ जुलै २००८ रोजी प्रेक्षकांच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आज २०२२ सालातही हीच मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसली. तब्बल १४ वर्ष या मालिकेने गाजवल्यानंतर अचानक गेल्या काही काळापासून मालिकेचा टीआरपी उतरताना दिसला. आयएमडीबी रेटिंगनुसार या मालिकेचं रेटिंग नेहमीच ९ च्या वर राहीलं आहे. पण आता या मालिकेचं रेटिंग ८.१ इतकं झालं आहे. याच कारण म्हणजे दयाबेनची एक्झिट.. पण आता लवकरच मालिकेत नवी डायाबेन येईल अशी आशा आहे.
अभिनेत्री दिशा वकानी हि तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती. तिची बोलण्याची पद्धत, गरब्याची स्टाईल, आयकॉनिक अदा आणि हटके डायलॉग्स नेहमीच चर्चेत राहिले आहेत. दयाबेनचा ‘टप्पू के पापा..’, ‘ए हालोsss..’ आणि ‘तोह.. क्या इरादा है..?’ हे डायलॉग विशेष गाजले. मात्र तिची एक्झिट काही काळानंतर मालिकेचा टीआरपी घेऊन गेली. यानंतर आता प्रेक्षक नव्या दयाबेनच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच अभिनेत्री श्रद्धा आर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमुळे नवी दयाबेन म्हणजे श्रद्धा आर्या असूच शकते असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.
अभिनेत्री श्रद्धा आर्या हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यातल्या त्यात इंस्टाग्रामवर रील बनवणं तिला फारच आवडत. यामुळे ती नेहमीच आपल्या ‘कुंडली भाग्य’ मालिकेच्या सहकलाकारांसोबत मजा मस्ती करतानाचे विविध व्हिडीओ आणि रील शेअर करताना दिसते. ‘कुंडली भाग्य’ मालिकेत प्रीताची व्यक्तिरेखा साकारणारी श्रद्धा आता दयाबेन होण्याच्या तयारीत आहे असे काही भासते आहे. कारण श्रद्धा आर्याने इंस्टावर शेअर केलेल्या व्हिडिओत ती आपल्या मैत्रिणींसोबत दयाबेनचा फेमस डायलॉग, ‘तोह क्या इरादा है..?’ ची मिमिक्री करताना दिसली आहे. इतकंच नाही तर..,तिने दयाबेनचे हावभावदेखील वेधले आहेत. त्यामुळे आता तारक मेहता साठी नवी आणि योग्य दयाबेन सापडली आहे असेच अनेकांचे म्हणणे आहे.
पण तूर्तास तरी सापडली रे सापडली दयाबेन सापडली असं म्हणायची संधी निर्मात्यांना मिळालेली नाही. निर्माता असित मोदी यांनी अभिनेत्री दिशा वकानी आता पुन्हा मालिकेत परतणार नाहीत असे स्पष्ट सांगितले आहे.
tara
शिवाय नव्या दयाबेनचा शोध सुरु आहे असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, नव्या दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात येणार आहेत.
Discussion about this post