हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गायकीमुळे प्रसिद्ध आहेत. विविध झोनची गाणी त्यांनी आजपर्यंत गायली आहेत. काही लोकप्रिय ठरली तर काही ट्रोल झाली. पण अमृता काही थांबल्या नाहीत. यानंतर आता त्या आणखी एक गाणं घेऊन आल्या आहेत. या गाण्याचे नाव ‘वो तेरे प्यार का गम’ असे असून हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पहिल्यांदाच ट्रोलिंगपेक्षा लाईक्सचा पाऊस जास्त पडत आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून या गाण्याचा टिझर रिलीज केला होता. यानंतर आता हे गाणं सारेगम या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालंय. ‘वो तेरे प्यार का गम’ असं या गाण्याचं नाव असून ‘माय लव्ह’ या हिंदी चित्रपटातील हे गाणं आहे. मुख्य म्हणजे हे गाणं अमृता यांनी आपल्या आवाजात रिक्रिएट केलेले आहे. ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याच्या रिक्रिएट वर्जनचे बोल अमृता फडणवीस यांचे स्वतःचे आहेत. तसेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्या स्वतः हे गाणं गातानासुद्धा दिसत आहेत.
या गाण्याच्या व्हिडिओत अमृता यांनी वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा वेस्टर्न गाऊन ड्रेस परिधान केला असून त्या सुंदर दिसत आहेत. हे नवं गाणं ऐकल्यानंतर पहिल्यांदाच ट्रोलिंगपेक्षा जास्त लाईक्सचा पाऊस पडल्याचे दिसले आहे. अनेकांनी अमृता यांच्या आवाजाचं चक्क कौतुक केलं आहे.
या गाण्याला रिलीज नंतर काही तासांमध्येच १० लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले होते. तर आता २० लाखाहून अधिक व्ह्यूज पार झाले आहेत. ‘माय लव्ह’ या हिंदी चित्रपटामधील हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं आणि सुप्रसिद्ध गायक मुकेश यांनी गायलं होतं. त्यानंतर आता अमृता यांनी गायलेलं हे रिक्रिएट व्हर्जन चांगलाच लोकप्रिय होताना दिसत आहे.
Discussion about this post