हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ४ च्या घरात किरण माने यांचा पराभव करून नुकताच रोहित शिंदे नवा नवा कॅप्टन झाला आहे. त्यामुळे सध्या घरातील वातावरण एकदम हॉट आहे. इथे कोणीच कोणाचं दोस्त नाही. सगळे एकमेकांवर गेम आणि कुरघोडी करण्यात व्यस्त आहे. आज विकास आणि किरण यांच्यात चालू गेमविषयी गहन चर्चा होताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अमृता देशमुख आणि किरण माने यांच्यात बोलता बोलता एक मोठा वाद होताना दिसणार आहे.
या प्रोमोमध्ये दिसतंय कि, विकास किरणला विचारतो आहे कि, ‘दादा एवढं काय..? इतका प्रॉब्लेम काय झाला आहे..? त्यावर किरण माने बोलताना दिसतात कि, ‘ते बरोबर आहेत पण तू त्यांना समजून घ्यायला चुकला आहेस. आम्हांला त्याचा शॉक बसत नाही. तुला माहिती नाही एवढे वाईट आहेत ते…’ आता इथे नक्की विकास आणि किरण कोणाबाबत बोलत आहेत हे आजच्या भागात कळेल. याशिवाय किरण माने अमृता धोंगडेशी देखील आज बोलताना दिसणार आहेत कि, ‘अगं मी हिला म्हणजे अमृता देशमुखला सहज एक वाक्य बोललो, हिच्या बोलण्यात सूर आणि शब्द परफेक्ट असतात…’ त्यावर अमृता- देशमुख म्हणाली.. आणि इमोशन्स नसतात? त्यावर.. किरण म्हणाला, नसतातच कारण… मग हि चिडली, रडली.’
मग किरण माने म्हणाले कि, रेडिओवर भावनाच ऐकू येतात. माझं म्हणणं आहे रेडिओचा विषय काढलायं कोणी..? तुझ्या नॉर्मल बोलण्यात भावना नसतात. कळत नाही तू त्याच्या बाजूने आहे की याच्या बाजूने आहे..? यावर अमृता देशमुखचे म्हणते कि, अहो कारण माझं नाव.. आणि RJ म्हणून बोलणं यात फरक आहे आणि बोलण्यात जर तुम्ही इमोशन्स नाही म्हणता तर कसं ना..? इमोशन्स वैगरे प्रमाणपत्र यांना द्यायची गरज नाहीये…’. शिवाय अमृता म्हणते तुम्ही खूपच आगाऊ आहात.. तर किरण म्हणतो, तुझा आगाऊपणा लय बघितला आहे, बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला…’ आता हे बोलणं वादात किती आणि कुठपर्यंत जाऊन पोहोचतंय हे पाहणं महत्वाचं आहे.
Discussion about this post