हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने गेल्या वर्षी दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्न गाठ बांधली. आदित्य धर हा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. लग्नानंतर तिचा फक्त ‘अ थर्सडे’ हा चित्रपट रिलीज झाला होता. पुढे बऱ्याच काळापासून ती सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रिय दिसली नाही. मात्र तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग फोटोजमध्ये होते. यानंतर आता तब्बल १ वर्षानंतर हि अभिनेत्री पती आदित्यासोबत देवीदर्शन करताना दिसली आहे. आदिशक्तीच्या दर्शनासाठी गेलेल्या या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. सर्वात आधी ती हिमाचल येथी नैना देवीच्या दर्शनासाठी गेली होती. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘माझ्या देवभूमीत, हिमाचल येथील नैना देवी/नैना देवी मंदिरात आशीर्वाद घेतले.’ या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट आणि आदित्यने डार्क ब्लु रंगाचा वेस्ट कोट परिधान केला आहे.
यानंतर त्यांनी ज्वाला देवीचे दर्शन घेतले. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘ज्वाला देवी मंदिरात दर्शनानंतरची अध्यात्मिक अनुभूती अव्यक्त आहे.’ या फोटोंमध्ये दोघांनीही सुवर्ण रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर यमीने लाल रंगाची ओढणीदेखील घेतली आहे. यातील एका फोटोत हे जोडपं हवन आहुतीचे दर्शन घेतानाही दिसत आहेत.
यानंतर हे जोडपे बगलामुखी मातेच्या दर्शनासाठी पोहोचले. या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, अध्यात्माचा गंध अक्षरशः ओसंडून वाहत होता. या फोटोंसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘बगलामुखी माता मंदिरात आशीर्वाद घेतला. शक्तीपीठ मंदिरांना भेट देण्यासाठी आम्ही घालवलेले गेले २ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव आहेत. ही मंदिरे दैवी शक्ती आणि विश्वासाचे केंद्र आहेत.’
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, यामीने २०१५ साली ‘बदलापूर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिने वरून धवनसोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र यामीला खरं ग्लॅमर मिळालं ते २०१९ मध्ये आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमातुन. कारण इथेच तिची आणि या सिनेमाच्या दिग्दर्शकाची अर्थात तिचा पती आदित्य धर याच्याशी भेट झाली. यानंतर त्यांची मैत्री फुलली, प्रेम झालं आणि आज यामी मिसेस धर म्हणून मानाने जगते आहे. सध्या त्यांच्या शक्तीपीठ दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Discussion about this post