हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात सांगितलं एक उच्च स्थान आहे. पण जेव्हा कानाजवळ एखादा मच्छर झूझझझझ असा कर्कश आवाज करतो. तेव्हा मात्र हा ध्वनी कोणत्याही संयमी माणसाचा संयम तोडू शकतो. याच भावना प्रकट करणारं एक रॅप सॉंग प्रसिद्ध कलाकार यशराज मुखाटे याने बनवले आहे. पारंपारिक ध्वनीला रंजक अंदाजात बदलणारा हा कलाकार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतो. त्याने बनविलेले विविध व्हिडीओ, रॅप सॉंग लोकप्रिय आहेत. यानंतर आता स्वतःच युनिक टॅलेंट वापरून त्याने मच्छर रॅप बनविले आहे. तर याचे शब्द काहीसे असे आहेत:-
कानो में करता ये रातभर कुई कुई,
इस कें चक्कर में मेरी निंद बरबाद हुई।
सबसे युजलेस, पथेटिक और फालतू येह क्रिचर,
कांटने कें अलावा इसका और ना कोई फिचर।।
कांट कांट कांटके तू कितना खून पियेगा,
तू वैसेभी १० दिन से ज्यादा कहाँ जियेगा।
कोहराम मचा दिया तुने जाके हर घर,
तू बस हाथ लग जा मेरे ‘साले मच्छर’।।
यशराजला हे रॅप सॉंग एका व्हायरल व्हिडिओतील ध्वनीमूळे सुचलं आहे. त्यामुळे या ध्वनीचा वापर त्याने गाण्यात केला . यशराजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर हे गाणे शेअर केले आहे. हे गाणे पोस्ट केल्यानंतर अनेकांनी या गाण्याला प्रचंड चांगला प्रतिसाद दिला आहे. काहींनी या गाण्यावर अतिशय मजेशीर अशा कमेंट देखील केल्या आहेत. त्याच्या क्रिएटिव्हीटीला अनेकांनी सलाम ठोकला आहे. यशराजचं ‘साले मच्छर’ हे रॅप सॉंग इतकं कमालीचं आहे कि, हे गाणं ऐकून मच्छरलाही त्याचा आवाजावर गर्व वाटू लागेल.
Discussion about this post