हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील बेधडक अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिचा आगामी चित्रपट तमाशा लाईव्हमूळे प्रचंड चर्चेत आहे. एका हटके भूमिकेतून हेमांगी प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामुळे हा चित्रपट फार खास आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी तिची बाई, बुब्स आणि ब्रा हि पोस्ट भयंकर गाजली होती. काहींनी ट्रोल केले काहींनी कौतुक केले. काहींनी भीती घातली काहींनी धमक्या दिल्या. पण हेमांगी व्यक्त झालीच. यानंतर आज या पोस्टला १ वर्ष पूर्ण झालं असून तमाशा लाईव्ह चे निमित्त साधत हेमांगीने परत एक पोस्ट लिहिली आहे. याची सुरुवात हेमांगीने माझ्या आयुष्यातला तमाशा Live असे लिहीत केली आहे.
या पोस्टमध्ये हेमांगीने लिहिले आहे कि, माझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’. माझ्या खूप viral झालेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ post ला आज वर्ष पूर्ण होतंय. And I am very proud of it. काही लोकं आजही त्याची खिल्ली उडवत मला आठवण करून देतायेत. Tag करतायेत. ते खिल्ली उडवणारच कारण त्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नाही आणि ते कधी कळणार ही नाही किंवा त्यांना मुद्दाम कळून घ्यायचं नाही. पण अनेक लोक या trollers एवढेच किंबहुना जास्तच म्हणेन मी खूप sensible, sensitive लोक माझ्या support ला आले आणि माझ्याशी जोडले गेले. खूप मुलींच्या, स्त्रियांच्या मनातल्या कुचंबनेला वाच्या फुटली. माझ्यासाठी हेच महत्वाचं होतं कारण माझा हेतूच तो होता. काही तरी वादग्रस्त, sensational बोलून मला कुठलीही publicity stunt वगैरे करायचा नव्हता. मला माझ्या देशाने व्यक्त व्हायचा अधिकारी दिलाय आणि मला ज्या गोष्टीचा समाजात वावरताना जर त्रास होत असेल तर तो मी बोलून दाखवणार. तसाच व्यक्त व्हायचा अधिकार काही trollers ने घेतला आणि वाट्टेल ते थराला जाऊन troll केलं. अजूनही करतात.
ते बरोबर की चूक, योग्य की अयोग्य मला माहीत नाही. बस समाज आणि माणूस म्हणून आपण कोण आहोत याची ओळख झाली. मित्र परिवाराने साथ सोडली, काहींनी unfollow केलं, distance तयार केला. अनेक हितचिंतकांचे calls आले. काही support करणारे तर काही भीती दाखवणारे. ‘आता तुझं career धोक्यात येणार, तुला कुणीही काम देणार नाही, तूझी image आता दूषित झाली, प्रेक्षक तुला कधीच स्वीकारणार नाहीत वगैरे वगैरे! मला त्यांना एवढंच सांगायचंय प्रेक्षक म्हणून तुम्ही माझं career हिरावून घेऊ शकता माझं जगणं नाही! मी त्यांच्या या बोलण्यामुळे घाबरले नाही पण वाईट नक्कीच वाटलं होतं. मनात आलं खरंच असं घडलं तर आपण दुसरा मार्ग धरू. दुसरं काहीतरी चांगलं काम करू. पण तसं काही करायची वेळ आली नाही कारण जुलै महिन्याच्या शेवटाला संजय दादांचा ‘तमाशा Live’ साठी call आला आणि दीड दोन महिन्यांचं work shop करून सिनेमा shoot सुद्धा केला आणि आज तो प्रदर्शित होतोय!
दादा, या सगळ्या घटनेनंतर ही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात! लोकांनी दाखवलेली भीती खोटी ठरवलीत यासाठी मी कायम ऋणी राहीन! हा सिनेमा तर माझ्यासाठी महत्वाचा आहेच पण मला माझ्यातला आत्मविश्वास जागवण्याची संधी दिलीत त्यासाठी खूप खूप. मागच्या वर्षी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ मुळे मी breaking news च्या भोवऱ्यात आले होते आज ‘तमाशा Live’ मुळे बातम्यांच्या वलयात आहे. माझ्या post ची anniversary मी अश्या पद्धतीने celebrate करेन वाटलं नव्हतं! आज चित्रपट प्रदर्शित होतोय खरा पण माझ्या आयुष्यात माझा ‘तमाशा Live’ मागच्या वर्षी याच दिवशी सुरू झाला होता!
Discussion about this post