हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात नुसते राडे पहायला मिळाले. कधी कॅप्टन्सीवरून तर कधी उगाच. पण या सगळ्या राड्यात कोण बरोबर आणि कोण चूक याचा हिशोब प्रेक्षक नेहमीच ठेवत असतात. अशावेळी प्रेक्षकांना कित्येक प्रश्न पडलेले असतात, जाब विचारायचा असतो आणि हे काम त्यांचा प्रतिनिधी म्हणून शो होस्ट मांजरेकर बखुबी निभावतात. याहीवेळी मांजरेकरांनी चावडीच्या दिवशी अनेकांची कान उघाडणी केली. दरम्यान या घरात एक भावनिक क्षण देखील आला आणि तो म्हणजे एव्हिक्शन. या आठवड्यात योगेश जाधव घराबाहेर झाला आहे.
बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी योगेश जाधव याला कमी वोट मिळाल्यामुळे तो घराबाहेर झाल्याचे सांगितले आणि तो एव्हीक्ट झाला. यावेळी योगेशला त्याची बिग बॉस मराठी पर्व ४ च्या घरातील त्याची स्पर्धक म्हणून झालेली एंट्री ते संपूर्ण प्रवास एका शॉर्ट क्लिपमध्ये दाखवण्यात आला. यावेळी स्वतःचा प्रवास पाहून योगेश काहीसा भावुक झाल्याचे दिसले. कधी युक्ती, तर कधी जास्त शक्ती वापरल्यामुळे घरात राडा झाला पण योगेश टिकून राहिला. डोक्यापेक्षा मनाने खेळणारा योगेश शेवटी आज घराबाहेर पडलाच. गेल्या काही काळात स्पर्धकांशी अपमानजनक भाषेत बोलणे, रोगावरील नियंत्रण गमावणे या प्रकारामुळे त्याची प्रतिमा मालिन होताना दिसली. कदाचित यामुळे प्रेक्षकांकडून कमी वोट आले आणि त्याला घराबाहेर यावे लागले.
या प्रवासात त्याने काही मित्र बनवले. ज्यांच्यासोबत त्याची चांगली गट्टी राहिली. त्याच्या एव्हिक्शनमुळे सगळ्यात जास्त अमृता धोंगडे रडताना दिसली. आदल्या दिवशी आपल्याला परफ्युम देणारा योगेश, काळजी घेणारा सवंगडी घरातून बाहेर पडला याचे तिला प्रचंड दुःख वाटलं. यावेळी मांजरेकरांनी घरातील दुश्मनी बाहेर बाळगू नका असे सांगत एक बोलण्याची संधी दिली. यासाठी योगेशने पुढाकार घेत अपूर्वाला हाय म्हटलं. यावर अपूर्वाने झालेल्या गोष्टींसाठी सॉरी म्हटलं. पण यावर योगेशने इट्स ओके ब्युटीफुल मुलींनी सॉरी म्हटलेलं चांगलं वाटत नाही म्हणत हसत हसत विषय सोडला. त्याचा हाच अंदाज प्रेक्षकांना भावत होता. मात्र वोटींगपुढे कुणाचंच चालत नाही आणि यामुळे अखेर योगेशच्या बिग बॉस मराठीमधील प्रवास इथेच थांबला.
Discussion about this post