हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खूप खुप खूप वर्षानंतर ‘झी मराठी’ वाहिनीचा गाजलेला हुकमी एक्का असलेला ‘फू बाई फू’ हा कॉमिक कार्यक्रम सुरु झाला. एक असा काळ होऊन गेलाय जेव्हा या कार्यक्रमाने टीआरपीची लेव्हल चांगलीच क्रॉस केली होती. अगदी नवख्या विनोदीवीरांनी एकत्र येऊन ‘फू बाई फू’ कार्यक्रम बनवला आणि टॉपवर नेला. या कार्यक्रमाने मालिका विश्व हादरवलं होतं. अनेक मालिकांना आव्हान देत या कार्यक्रमाने बाजी मारली होती. त्यामुळे जेव्हा पुन्हा ‘फू बाई फू’ शर्यतीत उतरलं तेव्हा अनेकांच्या पुंग्या टाईट झाल्या. पण वाटलं होत त्याच्या अगदी उलट झालं. हा कार्यक्रम आवरतं घेण्याच्या मार्गावर मार्गस्थ झाल्याचे बोलले जात आहे.
‘फू बाई फू’चा नवा सीजन सुरु झाला आणि तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम प्रेक्षकांना हसवू लागला. यामुळे प्रेक्षक भलतेच खूशीत होते. पण आता हा कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळला जातोय आणि याच कारण आहे टीआरपी. होय. ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम ९ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर ३ नोव्हेंबर, २०२२रोजी सुरू झाला. पण बोललं जातंय कि, ८ डिसेंबर, २०२२ रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग शूट होतोय.
अर्थात अगदी एक- दीड महिन्यात हा कार्यक्रम गुंडाळला जातोय. झी मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी मालिका अल्पावधीत गुंडाळली जात आहे. याचे कारण म्हणजे, मालिकेला मातब्बर कलाकार लाभले पण म्हणावा तसा टीआरपी काही लाभला नाही. म्हणूनच हा कार्यक्रम गुंडाळला जातोय असं सांगितलं जात आहे.
‘फू बाई फू’च्या नव्या हंगामात ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर असे दिग्गज विनोवीर प्रेक्षकांना हसवताना दिसत होते. तर या कार्यक्रमाला उमेश कामत आणि निर्मिती सामंत यांसारखे कमाल आणि धमाल असे परिक्षक लाभले होते. शिवाय अभिनेत्री वैदेही परशुरामी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती. पण आता हा कार्यक्रम गुंडाळला जाणार हे ऐकून साहजिकच ‘फू बाई फू’च्या चाहत्यांना मोठा धक्का लागणार आहे. पण चाहत्यांची नाराजी दूर करायला झी मराठी नव्या २ मालिका घेऊन येत आहे. येत्या २१ डिसेंबर पासून ‘लोकमान्य’ हि मालिका बुधवार – शनिवार, रात्री ९:३० वाजता लागणार आहे.तर ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?’ बुधवार – शनिवार रात्री १० वाजता लागणार आहे.
Discussion about this post